मुंबईची लाईफलाईन बदलणार, 12 रेल्वे प्रकल्पांची घोषणा, जाणून घ्या कोणकोणते आहेत प्रकल्प
mumbai railway projects: मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण 16 हजार 240 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.
कोणते आहेत 12 प्रकल्प
- सीएसटीएम ते कुर्ला पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
- मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्व लाईन होणार आहे. ३० किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
- हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे.
- बोरवली ते विरार पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
- विरार ते डाहून रोड तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. ६४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
- पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
- ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
- कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. ३२ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
- कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. १४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
- कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होईल.
- वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येत आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वे होणार आहे.
- निळजे ते कोपर दरम्यानच्या 5 किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे 15 ते 20 मिनिटांनी कमी होईल.
🚆Know the 12 Mumbai Rail Projects underway!
हे सुद्धा वाचा🧵A thread👇 pic.twitter.com/MH8K5FNfFe
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) August 30, 2024