Mumbai Local मधून पडून 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू! गोरेगाव-मालाडदरम्यानची घटना, गर्दीमुळे जीव गेला!

Mumbai Local Train youth death : गर्दीमुळे दरवाजामध्ये लटकलेल्या रतनचा हात सुटला आणि जे व्हायला नको होतं, ते घडलं. रेल्वे रुळांशेजारी असलेल्या खाबांला जोरदार धडक बसून रतला जबर मार बसला. यात रतन विश्वकर्मा हा तरुण जागीच ठार झाला.

Mumbai Local मधून पडून 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू! गोरेगाव-मालाडदरम्यानची घटना, गर्दीमुळे जीव गेला!
22 वर्षीय तरुणाचा मुंबई लोकलमधून पडून मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:45 PM

मुंबई : मुंबईत लोकल (Mumbai Local Death) प्रवासादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 22 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून दरवाजातून लटकून प्रवास करणं या तरुणाच्या जीवावर बेतलंय. गोरेगाव ते मालाड (Between Malad & Goregaon) रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. बोरीवली जीआरपीनं (Boriwali GRP) याप्रकरणी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. हा तरुण नालासोपाराला जायला निघाला होता. कामावरुन परतत असताना ही घटना घडली. कामावरुन घरी जात असतानाच वाटेल या तरुणाला काळानं गाठलं आहे. मुंबई लोकलमधून पडून जागीच या तरुणाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. अनेकदा गर्दीमुळे रेल्वे प्रवास हा धोक्याचा बनतो. मुंबई लोकलच्या गर्दीमुळे बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाजात लटकून प्रवास करतात.

नेमका अपघात कसा झाला?

मुंबई लोकलमधून पडून दगावलेल्या तरुणाचं नाव रतन विश्वकर्मा असं आहे. रतन हा नालासोपाराला जायला निघाला होता. आपलं काम आटोपून अंधेरीहून त्यानं ट्रेन पकडली होती. लोकलला प्रचंड गर्दी होती. मात्र तरिही प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये जागा न मिळाल्यानं रतन हा दरवाजात लटकला होता.

गर्दीमुळे दरवाजामध्ये लटकलेल्या रतनचा हात सुटला आणि जे व्हायला नको होतं, ते घडलं. रेल्वे रुळांशेजारी असलेल्या खाबांला जोरदार धडक बसून रतला जबर मार बसला. यात रतन विश्वकर्मा हा तरुण जागीच ठार झाला.

रेल्वे बळी रोखण्याचं आव्हान!

रेल्वे प्रशासनाकडूनही अनेकदा दरवाजात लटकून प्रवास करु नये, यासाठी वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र गर्दीच्या वेळी प्रवाशांचाही नाईलाज होतो. त्यामुळे दरवाजात लटकण्याशिवाय प्रवाशांसमोरही गत्यंतर उरत नाहीत.

याआधीही अनेकदा मुंबईत लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता आणखी एका तरुणाचा ऐन उमेदीच्या काळात लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

लोकलप्रवासादरम्यान या गोष्टी टाळा!

  1. दरवाजात लटकून प्रवास करु नका!
  2. शक्यतो डब्यातील मधल्या जागेत थांबण्याऐवजी गाडीत आतल्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करा
  3. गर्दी असल्यास शक्यतो प्रवास करणं टाळा
  4. चालत्या लोकलमध्ये चढण्या किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका
  5. लोकलच्या दरवाजातील पायरीवर उभं राहुन प्रवास करु नका

संबंधित बातम्या :

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

Jitendra Awhad on ED: तर मी आत्महत्या करणार, ईडी कारवाईच्या धसक्यानं मंत्री जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

Video | ‘मला त्यानं आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या, पोलिस असूनही मी हतबल, काहीच करु शकत नव्हतो’

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.