मुंबई : मुंबईत लोकल (Mumbai Local Death) प्रवासादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 22 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून दरवाजातून लटकून प्रवास करणं या तरुणाच्या जीवावर बेतलंय. गोरेगाव ते मालाड (Between Malad & Goregaon) रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. बोरीवली जीआरपीनं (Boriwali GRP) याप्रकरणी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. हा तरुण नालासोपाराला जायला निघाला होता. कामावरुन परतत असताना ही घटना घडली. कामावरुन घरी जात असतानाच वाटेल या तरुणाला काळानं गाठलं आहे. मुंबई लोकलमधून पडून जागीच या तरुणाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. अनेकदा गर्दीमुळे रेल्वे प्रवास हा धोक्याचा बनतो. मुंबई लोकलच्या गर्दीमुळे बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाजात लटकून प्रवास करतात.
मुंबई लोकलमधून पडून दगावलेल्या तरुणाचं नाव रतन विश्वकर्मा असं आहे. रतन हा नालासोपाराला जायला निघाला होता. आपलं काम आटोपून अंधेरीहून त्यानं ट्रेन पकडली होती. लोकलला प्रचंड गर्दी होती. मात्र तरिही प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये जागा न मिळाल्यानं रतन हा दरवाजात लटकला होता.
गर्दीमुळे दरवाजामध्ये लटकलेल्या रतनचा हात सुटला आणि जे व्हायला नको होतं, ते घडलं. रेल्वे रुळांशेजारी असलेल्या खाबांला जोरदार धडक बसून रतला जबर मार बसला. यात रतन विश्वकर्मा हा तरुण जागीच ठार झाला.
रेल्वे प्रशासनाकडूनही अनेकदा दरवाजात लटकून प्रवास करु नये, यासाठी वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र गर्दीच्या वेळी प्रवाशांचाही नाईलाज होतो. त्यामुळे दरवाजात लटकण्याशिवाय प्रवाशांसमोरही गत्यंतर उरत नाहीत.
याआधीही अनेकदा मुंबईत लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता आणखी एका तरुणाचा ऐन उमेदीच्या काळात लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.
Maharashtra | A 22-year-old youth died after falling from Mumbai’s local train. This accident took place between Goregaon and Malad station due to a rush on the train. A case has been registered and further investigation is underway: Boriwali GRP
— ANI (@ANI) March 23, 2022
CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान
Video | ‘मला त्यानं आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या, पोलिस असूनही मी हतबल, काहीच करु शकत नव्हतो’