सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक बंद झाली आहे. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.

सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा
अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 5:58 PM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हा पाऊस सोबत वादळी वारा घेऊन आलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडल्या आहेत. मुंबईत दोन ठिकाणी भलेमोठे होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या. घाटकोपरमध्ये तर थेट पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. या होर्डिंग कोसळल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. होर्डिंग कोसळल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल कोलमडली आहे. वादळी वाऱ्यामुळे मध्य रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक बंद झाली आहे. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला आहे. यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. विशेष म्हणजे वादळी वारे आणि पावसामुळे घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरही मोठा परिणाम पडलाय. हा मेट्रो मार्गही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडला आहे.

ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय

आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे लाखो नागरीक आज आपापल्या ऑफिस आणि कार्यालयांमध्ये नित्य नियमाने गेले. नियोजित वेळापत्रकानुसार लाखो प्रवासी संध्याकाळच्या वेळेस आपल्या कार्यालयीन कामकाम पूर्ण करुन घराच्या दिशेला निघतात. पण ऐन गर्दीच्या वेळेस अचानक पाऊस आला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा रेल्वे रुळावर बघायला मिळाल्या. बराच वेळ झाला तरी लोकल ट्रेन सुरु न झाल्यामुळे नागरीक लोकल ट्रेनच्या खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन पायी जाणं पसंत केलं.

प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न

ठाणे आणि मुलुंड दरम्यान झालेल्या बिघाड्याची गंभीर दखल मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. गर्दीची वेळ असल्याने तातडीने प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. तर दुसरीकडे तांत्रिक बिघाड कधी दुरुस्त होतो आणि ट्रेन कधी चालू होतात, याची प्रवाशी ताटकळत वाट पाहत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.