Western Railway Update | पश्चिम रेल्वे मार्गावरुन लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Western Railway Update | सध्या पश्चिम रेल्वे बद्दल महत्वाची अपडेट आहे. सकाळीच कार्यालय गाठण्यासाठी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बोरिवली, विरार येथून प्रवासी मोठ्या संख्येने चर्चगेट, दादर, परेल येथे येतात.
मुंबई : लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाते. मुंबईत दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खासकरुन नोकरदार वर्गासाठी मुंबईची लोकल सेवा मोठा आधार आहे. पण हीच लोकल सेवा जेव्हा कोलमडते, विस्कळीत होते, तेव्हा मात्र नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल होतात.
सध्या पश्चिम रेल्वे बद्दल महत्वाची अपडेट आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे घरातून कामावर निघालेल्या नोकरदारांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत पहाटेपासून लोकल प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पावसामुळे झालेला परिणाम
मागच्या काही दिवसात सततच्या पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला होता. पावसामुळे काही मार्गावर लोकल सेवा काही तासांसाठी बंद होती. काही मार्गांवर लोकल काही मिनिटं उशिराने धावत होत्या. त्यावेळी सुद्धा प्रवाशांचे हाल झाले होते. आता पाऊस नाहीय, तरी पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावतायत.
लोकल का उशिराने धावतायत?
बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.त्याची माहिती सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवरच दिली जात आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या सर्व गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. दुसरीकडे रेल्वे फलाटावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
ऑफिसला पोहोचण्यासाठी नोकरदार लवकर निघाले होते, मात्र ट्रेनला उशीर झाल्याने लोकांचा त्रास वाढला आहे. लोकल उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसू लागली आहे.