Mumbai Local train Update : भाजप म्हणतं दोन डोस घेणाऱ्यांना प्रवेश द्या, ठाकरे सरकार मात्र लोकलबाबतच्या निर्णयावर ठाम

राज्य सरकारकडून 25 जिल्ह्यांतील कोरोना निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली असून, त्याबाबतची नियमावली आज जारी करण्यात आली आहे.

Mumbai Local train Update : भाजप म्हणतं दोन डोस घेणाऱ्यांना प्रवेश द्या, ठाकरे सरकार मात्र लोकलबाबतच्या निर्णयावर ठाम
MUMBAI LOCAL
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 7:57 PM

मुंबई : राज्य सरकारकडून 25 जिल्ह्यांतील कोरोना निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली असून, त्याबाबतची नियमावली आज जारी करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार 25 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. सरकारच्या या नियमावलीमध्ये मुंबई लोकल रेल्वेचा कुठेही उल्लेख नाही. (Mumbai Local train Update today Maharashtra govt released new relaxation guidelines ease curbs in 25 districts and level 3 restrictions in 11 districts)

दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करु देण्याची मागणी

विरोधी पक्षनेत्यांकडून सातत्याने मुंबई लोकल रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करु देण्याची मागणी होत आहे. मात्र तरीही ठाकरे सरकारने मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवासबंदी कायम ठेवली आहे. “कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच काळापासून रेल्वेप्रवास करु दिला जात नाहीये. त्यांना प्रवासादरम्यान बराच वेळ प्रतिक्षा करावी लागत आहे. तसेच प्रवासादरम्यानचा हा खर्चही न परवडणारा आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांना कोलक रेल्वेप्रवासाची परवानगी दिली पाहिजे. कोविडच्या संकटकाळात सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यायला हवा,” अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली होती.

मुंबई लोकलचे नियम जैसे थे

राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये मुंबई लोकलसंदर्भात काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे मुंबई लोकलबाबत जे नियम सध्या लागू आहेत, तेच नियम यानंतरही लागू असतील. थोडक्यात मुंबई लोकबाबचे नियम जैसे थे असतील. सध्याच्या नियमांनुसार लोकल रेल्वेमधून सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास सध्या मनाई आहे. अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरदारांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी आहे.

राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध

महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

Maharashtra HSC Result 2021 | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा आणि कुठे पाहायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

(Mumbai Local train Update today Maharashtra govt released new relaxation guidelines ease curbs in 25 districts and level 3 restrictions in 11 districts)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.