Mumbai Local Train Update | आनंदाची बातमी; पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने धावणार
मुंबईत येत्या 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वे पूर्ववत सुरु केली जाणार आहे. (Mumbai Local Train Update)
मुंबई : मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरु केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वे सेवा पूर्ववत सुरु केली जाणार आहे. पण यात केवळ रेल्वे आणि महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेल्या लोकांना प्रवास करता येणार आहे. मात्र सर्वसामान्यांना प्रवासासाठी अद्याप वेट अँड वॉच करावं लागणार आहे. नुकतंच पश्चिम रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. (Mumbai Local Train Update)
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल रुळावर धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला 1201 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, आता त्यामध्ये 166 फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवल्या जाणार आहे.
दरम्यान पश्चिम रेल्वे जरी पूर्ण क्षमतेने धावणार असली, तरी यात रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान COVID19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. इतरांना स्टेशनवर गर्दी करू नये अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
This viral message does NOT mean Mumbai local trains are opening for all. *It just means restoration of local train services to 1,367 per day on WR Mumbai. *At present 1,201 services already run. So basically an addition of 166 services. *The word ‘all’ proves to b misleading? pic.twitter.com/KwN7V9MRnQ
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) January 26, 2021
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. या बैठकीनंतर वेगाने हालचाली होत असल्याचेच संकेत पश्चिम रेल्वेच्या निर्णयातून दिसत आहेत.
मुंबईच्या लोकल ट्रेनच्या निर्णय दिल्लीतूनच होणार
सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे. त्यामुळे याबाबतचे राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेऊन रेल्वेकडून येत्या काही दिवसांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईच्या धर्तीवर मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अन्य पर्याय असणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास दूरच्या उपनगरांतून मुंबईत दररोज येजा करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना मात्र खूप मोठा दिलासा मिळेल (Mumbai Local Train Update)
संबंधित बातम्या :