मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार
नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारी, (ता.28) रोजी पासून चालविण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास आता जलद होणार आहे किंबहुना त्यांना इच्छित स्थळी इच्छित वेळी पोहोचता येणार आहे. कोरोनानंतर वाढलेल्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारी, (ता.28) रोजी पासून चालविण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास खुला होता. त्यानंतर 15 ऑगस्टपासून कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या लसवंतांचा फक्त मासिक पास काढून लोकल प्रवास खुला केला. लसवंतांना लोकल प्रवास खुला केल्यानंतर दिवसेंदिवस लोकल मधील गर्दी वाढू लागली. तर, 18 ऑक्टोबर 2021 रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून एकूण 60 लाख 16 हजार प्रवाशांनी प्रवास केला.
यामध्ये मध्य रेल्वेवरून एकूण 32 लाख 55 हजार तर, पश्चिम रेल्वेवरून 27 लाख 61 हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे वाढत्या गर्दीला लोकल फेऱ्या कमी पडत होत्या. तर, प्रवाशांकडून रद्द केलेल्या लोकल सुरू करण्याची मागणी केली जात होती. परिणामी, मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने 100 टक्के लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या दरम्यान दरदिवशी मध्य रेल्वेवरून सरासरी 20 लाख 48 हजार प्रवासी आणि याच कालावधीत पश्चिम रेल्वेवरून दरदिवशी सरासरी 16 लाख 39 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. सध्या मध्य रेल्वेवरून 1 हजार 702 आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 304 लोकल फेऱ्या धावत आहेत. असे एकूण 95.70 टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत.
तर, गुरुवारी, (ता.28) पासून मध्य रेल्वेवरून 1 हजार 774 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 367 फेऱ्या अशा 100 टक्के फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
(Mumbai Local trains News Central and Western Railways will run 100 percent local trains)
हे ही वाचा :
Video : जेव्हा अमित शाहांनी काश्मिरी गाववाल्याला सांगितलं, मला फोन करु शकता !
आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी खरंच एकत्र लढणार? जयंत पाटील यांचं मोठं विधान