कोरोनाचं संकट दार ठोठावतंय, मुंबई महापालिका किती तयार?, काय उपाययोजना? वाचा सविस्तर…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची खबरदारी...

कोरोनाचं संकट दार ठोठावतंय, मुंबई महापालिका किती तयार?, काय उपाययोजना? वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 4:19 PM

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट (China Coronavirus) पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष (India Corona) काळजी घेतली जात आहे. मुंबई महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी मुंबई पालिकेने हॉस्पिटल्स सज्ज ठेवली आहेत. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शेजारील देशांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात जवळपास पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील डॉ. महारुद्र कुंभार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

1850 खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यात 328 खाटा आयसीयूसाठी, 650 खाटा ऑक्सिजनसाठी, तर उर्वरित रुग्णांसाठी 850 खाटा ठेवण्यात आल्या आहेत.

24 हजार लीटर ऑक्सिजनची साठवण क्षमता असून, रुग्णालयातील सर्व रुग्णांसाठी हा ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो.

डॉ.महारुद्र कुंभार म्हणाले की, शासनाकडून आदेश येताच आम्ही ४८ तासांत या सर्व सुविधा देऊ शकतो.

सध्या रुग्णालयात 83 डॉक्टर असून सुमारे 150 नर्स आहेत. गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार डॉक्टर आणि नर्स कमी करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारच्या आदेशानंतर डॉक्टर आणि नर्सची संख्या वाढवण्यात येणार आहेत.

याशिवाय कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास सेव्हन हिल्स आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

डॉ. महारुद्र कुंभार यांनीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे, स्वच्छता राखणे अशा काही सूचना दिल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.