CM Eknath Shinde| मुंबईचं दैवत सिद्धिविनायक चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणरायाला काय साकडं?

सिद्धिविनायक मंदिरात आज सदा सरवणकर, दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार घेऊन एकनाथ शिदे दर्शनासाठी पोहोचले.

CM Eknath Shinde| मुंबईचं दैवत सिद्धिविनायक चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गणरायाला काय साकडं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 3:44 PM

मुंबईः मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात  (Siddhivinayak Temple)आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पोहोचले. मुख्यमंत्री आपल्या महत्त्वाच्या पदाधिकारी आणि आमदारांसह आज सिद्धिविनायक मंदिरात गेले. तेथे पुजाऱ्यांनी गणरायाची विधिवत पूजा केली आणि प्रसाद म्हणून गणपतीचं मानाचं नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. कालच विधानसभेत (Maharashtra Assembly) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री कामावर रूजू झाले असून कामाच्या सुरुवातीलाच गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी आज सिद्धीविनायक मंदिर गाठलं. मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाची सिद्धीविनायकावर नितांत श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीदेखील अगदी साधेपणाने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

साकडं काय घातलं?

महाविकास आघाडीतील महत्त्वाचे मंत्री आमदार यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. पाहता पाहता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असलेलं महाविकास आघाडी सरकार धारातीर्थी पडलं. आता भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेना गटासह नवीन सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झालेत. पुढील अडीच वर्षांसाठी त्यांनी राज्याचा कारभार हाती घेतला आहे. मात्र शिंदेंसमोर आव्हानंही तितकीच आहेत. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच राज्यात सर्वत्र दमदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. पावसाच्या प्रमाणानुसार, योग्य नियोजन करण्याच्या त्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. राज्यातलं नवं सरकार यशस्वीरितीने कामगिरी करेल, त्यासाठी बळ दे, अशीच जणू प्रार्थना त्यांनी सिद्धिविनायक चरणी केली असावी.

मानाचं नारळ देऊन स्वागत

सिद्धिविनायक मंदिरात आज सदा सरवणकर, दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार घेऊन एकनाथ शिदे दर्शनासाठी पोहोचले. यावेळी मंदिरातील गुरुजींनी नव्या मुख्यमंत्र्यांना गणपतीचं मानाचं नारळ आणि शाल देऊन स्वागत केलं. गणपतीचा प्रसादही नवनियुक्त मुख्यमंत्र्यांना दिला. त्यानंतर शिंदेसेनेचा ताफा मंत्रालयाच्या दिशेने निघाला.

उपमुख्यमंत्री नागपुरात

दरम्यान, उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच नागपुरात पोहोचले. नागपूर विमानतळापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. शहरातून देवेंद्र फडवणीस यांची मोठी विजयी रॅली काढण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी विजयी रॅलीला संबोधित केले.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.