Maharashtra Rain weather Update : पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?, वाचा हवामान विभागाचा रिपोर्ट

राज्यात पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारेल, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Maharashtra Rain weather Update : पुढचे पाच दिवस पावसाची दडी, पुन्हा आगमन कधी?, वाचा हवामान विभागाचा रिपोर्ट
Rain Update
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 8:43 AM

मुंबई :  राज्यात मागील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडला. राज्याच्या अनेक भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसाने अनेक ठिकाणी पिकांना जीवदान मिळालं. मात्र आता पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पश्चिम किनारपट्टी आणि उ. महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता

आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस बरल्यानंतर आता पुन्हा पाऊस दडी मारण्याची चिन्हे आहेत. मागील चार ते पाच दिवस राज्याच्या काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, मात्र काही शहरं आणखीही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. या शहरांना आणखी पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. मात्र जिथे हलक्या पावसाचा अंदाज आहे, त्या भागांत ढगाळ वातावरण राहिल. परंतु आठवडाभर चांगलं कमबॅक केलेला पाऊस आता चार ते पाच दिवसांसाठी ब्रेक घेणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय.

सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं कमबॅक होणार

राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पाऊस असेल पण पावसाचे प्रमाण कमी असेल. पाऊस पडले पण हलका ते मध्यम स्वरुपाचा असेल. पाऊस नसण्याची परिस्थिती सर्वसाधारण दहा दिवस असेल, असं भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी सांगितले.

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसारपुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही. इशारे, अंदाज नाहीत म्हणजे मान्सून सक्रिय नाही. पुढील काही दिवस अशीच प्रकारची परिस्थिती राहिल, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं पुन्हा आगमन होईल, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.

(Mumbai Maharashtra Rain And Weather Update Next 5 days No Rainfall in maharashtra By IMD)

हे ही वाचा :

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

फ्लावर-कोबी करताय, मग सावधान, ‘या’ कंपनीचं बियाणं बोगस असल्याचा गंभीर आरोप

बैलपोळ्याचा सण गोड होणार, खरिपातील पहिल्या पिकाची काढणी सुरु, शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.