मुंबईत पती-पत्नीच्या वादात पतीचा संताप अनावर, अन् पुढे घडला अनर्थ
मुंबईमधील लालबागमध्ये पती-पत्नीचा वादात एक कुटुंबच उद्धवस्थ झाले. पित्याने अकरा वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटसुद्धा मिळाली आहे. पत्नी ऑफिसला गेली असताना पतीने हा प्रकार केला.
मुंबई : पती-पत्नीचा वादात एक कुटुंबच उद्धवस्थ झाले. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे अकरा वर्षाच्या मुलीची पित्याने हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. लालबागमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय पित्याने केलेल्या या प्रकारामुळे त्रिकोणी कुटुंबात आता पत्नीच राहिली. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटसुद्धा मिळाली आहे. पोलिसांनी हत्या आणि आत्महत्येची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले
मुंबईतील लालबाग भागात राहणारे भूपेश पवार (42) यांनी आपल्या 11 वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लालबागच्या गणेश गल्लीतील विमावाला महल इमारतीत हा प्रकार घडला. घरात कोणी नसताना भूपेशने घरात हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आधी आपल्या 11 वर्षाच्या मुलीला गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेतला.
दोघांमधील वाद होता कारण
आत्महत्यांचे कारण पती पत्नीच्या होता. मंगळवारी सकाळी भुपेशच आणि त्याची पत्नी भाग्यश्री यांच्यांत वाद झाला होता. भाग्यश्री कामावर गेल्यानंतर त्याने घरात बाप आणि मुलगी होती. मग भुपेशने आधी मुलीला गळफास देऊन तिची हत्या केली. नंतर स्वतःने गळफास लावली. पत्नीने दुपारी फोन केला असता भूपेशने उचलला नाही. त्याची पत्नी घरी गेली तर तिला दार बंद दिसले. दार ठोठवल्यानंतर कोणी उघडले नाही. मग तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी भूपेष आणि मुलगी दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी पोलिसांना मयत भुपेशच्या हस्तलिखित चिट्ठी सापडली आहे.