मुंबईत घरोघरी नाही, पण वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार: महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईत दर दिवसाला 1 लाख लस देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. कोवॅक्सिन दोन दिवसात मुबलक प्रमाणात येतील, असेही महापौर म्हणाल्या.  (Mumbai Mayor Kishori Pednekar on corona vaccine)

मुंबईत घरोघरी नाही, पण वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार: महापौर किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 4:18 PM

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरण साठा जसा उपलब्ध आहे, त्याप्रमाणे लस दिली जात आहे. कोरोना लस केंद्रावर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जावे. तसेच सध्या तरी घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. मात्र वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar on corona vaccine)

मुंबईत दर दिवसाला 1 लाख लस देण्याबाबत प्रयत्न

मुंबईत सध्या तरी 30 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु आहेत. तर 60 खासगी ठिकाणी लस दिल्या जात आहे. सध्या तरी मुंबईत दुसऱ्या कोरोना डोसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. येत्या 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. जे पहिले येतील त्यांना लस दिली जाईल. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण सुरु आहे. खासगी रुग्णालयातही लसीकरण केले जात आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

सर्वांना केंद्राने दिलेल्या अॅपमध्ये नोंदणी करुन लस दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. केंद्राने दिलेल्या सूचना त्या आपण पाळून सर्व लसीकरण करत आहोत. मुंबईत दर दिवसाला 1 लाख लस देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. कोवॅक्सिन दोन दिवसात मुबलक प्रमाणात येतील, असेही महापौर म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींचे आभार

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसात लसीचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला. मी त्यांचे आभार मानते, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईत जिथे गर्दी होते तिथे गर्दी कमी व्हावी ही अपेक्षा आहे. मुंबईत दुकानदारांनी स्वयंसेवक नेमावे आणि काम करावं. गर्दी करु नका. राज्य सरकार जो निर्णय घेतील तो सर्वांच्या हिताचा आहे. कोरोनाच रूप गडद आहे. लस ही सर्वाना द्यायची आहे. एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

रुग्णसंख्या कमी जास्त श्रेय मुंबईकरांना

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होते आहे. याचे श्रेय पहिलं मुंबईकरांना जातं आहे. डॉक्टर आणि नर्स यांना श्रेय आहे. पण मुंबईकरांना जास्त श्रेय आहे. दुकानामध्ये जी गर्दी होते आहे. दुकानदारांनी आणि ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे. एकमेकांची काळजी घ्या. स्वंशिस्तीने सर्वांनी समजून घेतले पाहिजे. कायम पोलिसांना पाचारण करणं योग्य नाही. पोलीस देखील योग्य काम करत आहे, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.  (Mumbai Mayor Kishori Pednekar on corona vaccine)

संबंधित बातम्या :

Fact Check | मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेऊ नये, मेसेजमधील दावा खरा की खोटा?

मुंबईकरांनो कोरोना लसीकरण करायचं? तुमच्या जवळचे कोणते केंद्र आज सुरु, कोणते बंद? पाहा यादी

Maharashtra Free Corona Vaccination: 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण, नवाब मलिक यांची माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.