Worli Gas Cylinder Blast : उत्तर प्रदेशातील घटनेवेळी कुठे गेली होती संवेदना? पेडणेकरांचा शेलारांना टोला

वरळीतल्या गॅस सिलिंडर स्फोटा(Worli Gas Cylinder Blast)त आईनंतर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर एक बाळ अनाथ झाले आहे. मात्र त्या बाळाचे आई-बाप शिवसेना (Shiv Sena) असेल असे वक्तव्य पेडणेकर यांनी केले.

Worli Gas Cylinder Blast : उत्तर प्रदेशातील घटनेवेळी कुठे गेली होती संवेदना? पेडणेकरांचा शेलारांना टोला
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 12:47 PM

मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना त्यांच्यात पक्षात काही स्थान उरले नाही. मी निजले असे म्हणताय तर कोविडकाळात तुम्ही काय अंगाई गात होतात काय, असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विचारला आहे. वरळीतल्या गॅस सिलिंडर स्फोटा(Worli Gas Cylinder Blast)त आईनंतर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर एक बाळ अनाथ झाले आहे. मात्र त्या बाळाचे आई-बाप शिवसेना (Shiv Sena) असेल असे वक्तव्य पेडणेकर यांनी केले.

‘उत्तर प्रदेशातील घटनेवेळी कुठे गेली होती संवेदना’ वरळीतल्या घटनेनंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तसेच महापौर पेडणेकर यांच्यावर टीका केली. अशा काळात महापौर कुठे निजल्या अशी टीका शेलारांनी केली. त्याला पेडणेकर यांनी प्रत्त्युत्तर दिलंय. उत्तर प्रदेशात 60 मुलं ऑक्सिजनविना गेली, तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या. अशाप्रकारचं वक्तव्य हा महिलांचा अवमान आहे. आपण कोणाविषयी बोलतो आहोत, याचं भान त्यांना राहिलेलं नाही. दरम्यान, त्यांच्या वक्तव्याची महिला आयोगानं दखल घेतली असून पोलीस आयुक्तांना अहवाल देण्यासही सांगितलंय, अशी माहिती त्यांनी दिली.

‘हे डोक्यावर पडलेले, सत्ता गेली म्हणून तडफडताहेत’ ते पत्रकार परिषद घेत असतील आणि काहीही बोलत असतील, जर तुमच्याकडे पुरावे असतील तर घेऊन या. कारवाई केली जाईल. केवळ भौ भौ करू नका, असा टोला त्यांनी शेलारांना लगावला.

‘2 डॉक्टर आणि एका नर्सला तातडीनं निलंबित केलं’ घटना घडली त्यावेळी शिवसैनिक तातडीनं घटनास्थळी पोहोचले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात आलं. पोद्दारला उपचार होणं शक्य नव्हतं. अॅम्ब्युलन्स खरंतर कस्तुरबालाच येणं आवश्यक होतं, मात्र नायरला अॅम्ब्युलन्स गेली. तेथे काही प्रमाणात उपचाराला उशीर झाला. असंवेदनशीलता दिसली, त्यामुळे 2 डॉक्टर आणि एका नर्सला तातडीनं निलंबित केलं. वडील नायर हॉस्पिटल(Nair Hospital Mumbai) मध्येच क्रिटीकल कंडीशनमध्ये होते. आईला 56 टक्के भाजलं होतं, अशी माहिती महापौरांनी दिली.

‘राणेंना एवढे महत्त्व कशाला?’ नितेश राणें(Nitesh Rane)ना एवढं का सिरीयस घेताय? त्यांच्या म्हणण्याला काही बेस नाही. फक्त राजकारणासाठी दिसत राहायचं आणि बोलत राहायचं. यांच्यापैकी कोणी अॅम्ब्युलन्स तरी पाठवली का? शिवसैनिक, कार्यकर्तेच सुरुवातीला मदतीला धावले, असे पेडणेकर म्हणाल्या.

OBC Reservation | आरक्षण संपवण्याचं काम कुणाच्या सांगण्यावर, पाठीमागचं इंगित काय, भुजबळांचा सवाल; ‘त्या’ लोकांना आवरा, फडणवीसांना आवाहन

वरळीत सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

महिला डॉक्टरचा मित्रासोबत अश्लील व्हिडीओ, कम्पाऊण्डरच्या प्रियकराकडून ब्लॅकमेल, मुंबईत दोघांना अटक

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.