मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होम क्वारंटाईन, घरुनच महापालिकेची कामे करणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होम क्वारंटाईन, घरुनच महापालिकेची कामे करणार
Follow us
| Updated on: Apr 20, 2020 | 6:18 PM

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी स्वत:हून होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. यापैकी काही पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे किशोरी पडणेकर यांनी स्वत:हून पुढचे 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे (Mumbai Mayor Kishori Pednekar).

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. मुंबईत तर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत मुंबईत 2 हजार 724 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. राज्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत नव्या 283 रुग्णांची वाढ झाली. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, मुंबई महापालिका मुख्यालयातील कर्मचारी यांच्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक भागांची पाहणी केली आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्या भागांचीदेखील त्यांनी पाहणी केली आहे. याशिवाय आरोग्य शिबिरांनाही त्यांनी भेट दिली आहे. कोरोनाविरोधात लढत असताना मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

घरुनच महापालिकेची सर्व कामं करणार

“मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आणि आरोग्य चेअरमेन अमेय घोले यांनी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून बंगल्यावर सर्वांची तपासणी केली जात आहे. काही पत्रकारांसोबत माझा संपर्क आलेला होता. त्यामुळे मी स्वत:ची तपासणी करत आहे. आपल्यामुळे इतरांना लागण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे”, असं किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9मराठी’ बोलताना सांगितलं.

“आपल्याकडे चांगल्या सोई-सुविधा आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हाट्सअॅपद्वारे आपण चर्चा करु शकतो. त्यामुळे घरुनच महापालिकेची सर्व कामे करणार”, असंदेखील किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण, वैद्यकीय सूत्रांची माहिती

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.