Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishori Pednekar : माझ्या दादाकडं वाकड्या नजरेनं बघू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी, कुटुंबातील सर्वांना संपवण्याचा इशारा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे.

Kishori Pednekar : माझ्या दादाकडं वाकड्या नजरेनं बघू नका, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी, कुटुंबातील सर्वांना संपवण्याचा इशारा
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 1:20 PM

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Death Threat) यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही  9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रात काय लिहिलं याविषयी माहिती दिली.

किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या:

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर पत्र येतचं असतात, असं सांगितलं त्यामध्ये ते पत्र होतं. जी पत्र येतात ती सगळीचं पत्र उघडतो. हे पत्र जुन्या घराच्या पत्त्यावर आलं आहे. त्याचा पत्ता चुकलेला होता पण ते आलेलं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.  ते पत्र अंत्यत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे. बाहेर वेगळं नाव आहे. पनवेल पोस्ट आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मी यासंदर्भात पोलिसात तक्रार देणार आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मी शिवसेनेची कार्यकर्ती असून धमकावून घरी बसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेतलीच पाहिजे. आशिष शेलार यांच्यासंदर्भातील वाद वेगळा आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं पाहू नका

काल संध्याकाळी महापौर बंगल्यावर पत्र दाखल झालेलं आहे. या पत्रात सरळ सरळ धमकी देण्यात आली आहे. महापौर आणि  सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअर द्वारे आलेलं आहे. पत्राच्या पाकिटावर वेगळं नाव आहे. पत्रात वेगळं नाव आहे. खारगर, पनवेल आणि उरण अशी तीन ठिकाणं त्याचा उल्लेख आहे. हे निनावी पत्र आहे.

किशोरी पेडणेकर यांना दुसऱ्यांदा ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी फोन कॉलवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत.  थोड्याच वेळात महापौर किशोरी पेडणेकर तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात नाव वेगवेगळी असल्यानं हे पत्र कुणी पाठवलं आहे याचा तपास होण्याची शक्यता आहे.

अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया

या पत्राचा संबंध महापौरांनी भाजपशी जोडला नाही. तातडीनं महापौरांना सुरक्षा दिली पाहिजे. राज्य सरकारनं या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीची दखल घेऊन तातडीनं कारवाई केली पाहिजे, असं अतुल भातखळकर म्हणाले.

इतर बातम्या: 

Ashish Shelar : भाजप आमदार आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन, गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

नायर रुग्णालय प्रकरणी आशिष शेलारांकडून दिशाभूल सुरु, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार

Mumbai mayor Kishori Pednekar gets death threat letter

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.