‘तुझ्या बापाला’ ट्विट हा शिवसैनिकाचा राग होता, आक्षेपार्ह भाषेतील ट्वीटवर महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. (Kishori Pednekar reacts to troll on social media)

'तुझ्या बापाला' ट्विट हा शिवसैनिकाचा राग होता, आक्षेपार्ह भाषेतील ट्वीटवर महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण
महापौर किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 10:46 AM

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘टीव्ही9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं. (Mumbai Mayor Kishori Pednekar reacts to troll on social media for objectionable language on Twitter says Tujhya Bapala)

महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण काय?

“ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्याने तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं” असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. “आरोप करणाऱ्यांनी करत राहावे त्यांचं ते काम आहे, सर्व शहानिशा करुनच टेंडर दिल जाईल. दलाल वगैरे काही नाही, सर्व कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाईल” असं उत्तर महापौरांनी मनसेच्या आरोपांना दिलं.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल महापौर पेडणेकरांविषयी संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट नंतर डिलीट केले असले तरी त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

“मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढला गेला आहे. मुंबईकरांच्या एक कोटी लसींसाठी नऊ कंपन्या समोर आहेत” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली होती. या व्हिडीओची लिंक ‘टीव्ही9 मराठी’च्या ट्विटर अकाऊण्टवर शेअर करण्यात आली होती. या ट्वीटवर एका युजरने “काँट्रॅक्ट कोणाला दिलं?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देण्यात आलं आहे.

पेडणेकरांविषयी संताप

महापौरासारख्या पदावरील व्यक्तीने जाहीर व्यासपीठावरुन अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उठली आहे. अनेक जणांनी किशोरी पेडणेकर यांना आक्षेपार्ह ट्वीटबद्दल जाबही विचारला. त्यानंतर महापौरांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलेले ट्वीट डिलीट केले, मात्र या ट्वीटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काय आहे ट्विट?

मूळ ट्वीट पाहा (Kishori Pednekar reacts to troll on social media)

महापौर काय म्हणाल्या?

मुंबईकराना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढला गेला असून जे नियमात बसतील त्यांच्याकडून लस घेऊ. मुंबईत लसीचा तुटवडा आहे म्हणून केंद्र बंद आहेत. केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांना लस दिली जाते पण पालिकेला मिळत नाही. केंद्राकडून आम्ही सुद्धा लस विकत घ्यायला तयार आहोत पण नागरिकांना मोफत लस देऊ. कॉर्पोरेट क्षेत्रात लस दिली जाते पालिका किंवा राज्य सरकारला मुबलक दिली जात नाही, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली होती.

संबंधित बातम्या :

लसीचे कंत्राट कोणाला दिले?, तुझ्या बापाला, महापौर पेडणेकरांच्या उत्तरावर सोशल मीडियावर संताप

Kishori Pednekar | मुंबईकरांच्या 1 कोटी लसींसाठी 9 कंपन्या! : महापौर किशोरी पेडणेकर

(Mumbai Mayor Kishori Pednekar reacts to troll on social media for objectionable language on Twitter says Tujhya Bapala)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.