मुंबईतील कोरोना नियंत्रित, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबईत आता बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. मुंबईत डबलिंग रेट हा 50 दिवसांवर पोहोचला (Mumbai Mayor kishori Pednekar on Mumbai Lockdown Again)  आहे.

मुंबईतील कोरोना नियंत्रित, पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही : महापौर किशोरी पेडणेकर
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 7:05 PM

मुंबई : “मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच “मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा दर हा 50 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज रेटही 70 टक्के आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor kishori Pednekar on Mumbai Lockdown Again)

“मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईत पुणे, ठाण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाबाबत मुंबईतील परिस्थिती या शहरांच्या तुलनेत पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे पुणे किंवा ठाणे पुन्हा लॉकडाऊन करावे लागले, तशी गरज मुंबईला नाही,” असे महापौर म्हणाल्या.

“मात्र ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळतील, त्या ठिकाणी आठवडाभरासाठी लॉकडाऊन करत आहोत. मात्र पूर्ण मुंबई लॉकडाऊन नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केलं.

“जर पुन्हा मुंबईत लॉकडाऊन होऊ नये, असं वाटत असेल तर सर्वांनी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर केला पाहिजे. सतत सॅनिटायझर वापरावं. जर ताप असेल तर डॉक्टरकडे जा,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor kishori Pednekar on Mumbai Lockdown Again)

मुंबईचा डबलिंग रेट 50 दिवसांवर 

“मुंबईत आता बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. मुंबईत डबलिंग रेट हा 50 दिवसांवर पोहोचला आहे. याआधी आपण ज्या टेस्टिंग करत होतो. त्या दोन ते चार हजारापर्यंत जात होत्या. तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या ही हजार ते दीड हजारपर्यंत होती. मात्र आता जवळपास सात ते आठ हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या आपल्याकडे 250 व्हेटिंलेटर आहेत. सात हजार बेड आहेत.” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“काही ठिकाणी हाय सोसायटीत कोरोना रुग्ण आढळत आहे. अनुपम खेर, अमिताभ बच्चन रेखा यासारख्या सेलिब्रिटीपर्यंत कोरोना पोहोचला आहे. मिशन बिगीन अगेनमुळे शुटींग वैगरे सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी शुटींग आहेत, त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग, मास्क वापर होतो का, यावरही वॉर्ड ऑफिसरला लक्ष देण्यास सांगितले आहे.”

हाय सोसायटीत कोरोनाचा संसर्ग वाढला

“सध्या झोपडपट्ट्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र हाय सोसायटीमध्ये कोरोना वाढू लागला आहे. याचा अर्थ अनेक लोक घराबाहेर पडली आहे. त्यामुळे हे वाढल्याचं बोललं जात आहे. झोपडपट्टीत 4T हे तंत्र वापरलं होतं. त्यानुसार आता हाय सोसायटीनेही हे तंत्र वापरण्यास परवानगी द्यावी किंवा त्यांनी स्वत: करावं. ज्या ठिकाणी रुग्ण आढळत आहेत, त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून करत आहोत,” असेही महापौरांनी सांगितले. (Mumbai Mayor kishori Pednekar on Mumbai Lockdown Again)

संबंधित बातम्या : 

Pune Lockdown | सरकारनं अफू घेऊन निर्णय घेतलाय का? पुणे लॉकडाऊनवर मनसेचा सवाल

Raigad Lockdown | रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन, अदिती तटकरे यांची घोषणा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.