Kishori pednekar : लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुंबई महापालिका सज्ज असल्याचा महापौरांचा दावा

87 लोक आत्तापर्यंत दक्षिण अफ्रिकेतून आलेत. आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे,  कोविड सेंटर सज्ज आहेत, आता ते पुन्हा ॲक्टीव करावे लागणार आहेत अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Kishori pednekar : लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मुंबई महापालिका सज्ज असल्याचा महापौरांचा दावा
किशोरी पेडणेकर, महापौर,मुंबई
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 5:08 PM

ओमिक्रोन हा नवा व्हेरिएंट आल्यानंतर सरकारबरोबरच मुंबई महापालिकाही अलर्ट मोडवर आली आहे. मुंबई महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत? मुंबई महापालिका कशी सज्ज आहे? याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. दुसऱ्या लाटेचा सामना मुंबई महापालिकेने चांगल्या प्रकारे केला होता. मंबई मॉडेलची जगभर चर्चा झाली होती.

87 लोक आत्तापर्यंत दक्षिण अफ्रिकेतून आलेत

87 लोक आत्तापर्यंत दक्षिण अफ्रिकेतून आलेत. आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे,  कोविड सेंटर सज्ज आहेत, आता ते पुन्हा ॲक्टीव करावे लागणार आहेत अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच कोविडचा मुकाबला करण्यासाठी डाॅक्टर , नर्सेसचा स्टाफ आपल्याकडे आहे, असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत. एअरपोर्ट बाबात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि बाहेरील देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटुबीयांची चाचणी केली जाईल, असंही महापौरांना स्पष्ट केलं आहे.

जे करता येईल ते करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

जे करता येईल ते ते करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. लाॅकडाऊन कोणालाच नको आहे मात्र नियमावली पाळा असं आवाहनही महापौरांकडून करण्यात आलंय. काही कोविड सेंटर बंद ठेवली होती मात्र आता ती पुन्हा सरु करण्यासाठी पालिका सज्ज असल्याचं महापौर म्हणाल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत आयुक्त उत्सुक नव्हते, आज मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत आयुक्तांची बैठक आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले नाही आणि पालक सुद्धा मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते अशी माहिती शाळांबाबत महापौरांनी दिली आहे.

मालाड येथील स्कायवाॅकला स्थानिकांचा विरोध

मालाड येथील स्कायवाॅकला विरोध हा स्थानिकांचा आहे म्हणून आज पहाणी केली. अतुल भातखळकर यांना स्कायवाॅक पाहीजे असेल तर त्यांनी बांधून घ्यावा, असा टोलाही महापौरांनी लगावला आहे.  त्यांच्याच नगरसेवकांनी या स्कायवाॅकला विरोध केला होता जनतेच्या भावनांचा विचार करावा असंही महापौर म्हणाल्या आहेत. ही वेळ भेदभाव करण्याची नाही, सर्वांची हातावरचे पोट आहे मात्र आता जीव महत्वाचे आहेत, फेरीवाल्यांनी सतर्क राहिलं पाहिजे असं आवाहन महापौरांनी केलं आहे.

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

IND vs NZ : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी तोंडचा घास हिरावला, एक विकेट घेण्यात भारतीय गोलंदाज अपयशी, कानपूर कसोटी अनिर्णित

Karjat Election : कर्जत नगर पंचायत निवडणुकीवरुन पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना! कोण बाजी मारणार?

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.