Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

गुरुवारी मुंबई आणि लगतच्या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या वेधशाळेमध्ये कुलाबा येथे 18 मिमी पाऊस झाला. तर सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 11.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’
मुंबईत येत्या 48 तासांत मुसळधार! Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 8:36 AM

मुंबई : मुंबईतील (Mumbai) अनेक भागांत गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली तसेच कुर्ल्यातील (Kurla) काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभर ठाण्यात (Thane) पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने रविवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या मुंबईसह लगतच्या भागात जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. राज्यात देखील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. जर राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा राज्यात मान्सून वेळेच्या आगोदर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकला आहे. पण येत्या दोन दिवसात जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना 20 जूनपासून समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे

पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता

गुरुवारी मुंबई आणि लगतच्या भागात तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या वेधशाळेमध्ये कुलाबा येथे 18 मिमी पाऊस झाला. तर सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 11.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उद्या पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागत पावसाचं प्रमाण वाढणार असल्याचं सुषमा नायर यांनी सांगितलं. हवामान खात्याच्या अंदाजनुसार उद्यापासून मान्सून अनेक भागात सक्रीय होणार आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या पावसात वीज अंगावर कोसळून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने मच्छिमारांसाठी देखील अलर्ट जारी केला

हवामान खात्याने मच्छिमारांसाठी देखील अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना 20 जूनपासून समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. “उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह लगतच्या भागात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग 60 किमीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना 20 जून समुद्रात न जाण्याच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास त्याचा परिणाम अनेक गोष्टीवर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे पावसाची तीव्रता वाढल्यास सुरक्षित स्थळी थांबण्याचा निर्णय हवामान खात्याने दिला आहे. तसेच वाहतुकीवर देखील पावसासह वाऱ्याचा परिणाम होणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.