मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग तयार, 37 हजार कोटींचा 33.5 किमी लांब ट्रॅक कधीपासून सुरु होणार?

mumbai metro 3: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो 3 हा प्रकल्प पूर्ण करत आहे. एमएमआरसीएल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी जपानकडून सहकार्य मिळाले आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास मुंबईकरांचा वेळ चांगलाच वाचणार आहे. 

मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग तयार, 37 हजार कोटींचा 33.5 किमी लांब ट्रॅक कधीपासून सुरु होणार?
mumbai metro 3
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 11:04 AM

मुंबईकरांना लवकरच नवीन भेट मिळणार आहे. मुंबईकर मेट्रो 3 ची वाट पाहत होते. ती लवकरच सुरु होणार आहे. 2017 पासून सुरु असणाऱ्या या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे 37 हजार कोटींचा मुंबई मेट्रो लाइन 3 (Mumbai Metro Aqua Line) प्रकल्प कधीपासून सुरु होणार आहे, त्याची प्रतिक्षा मुंबईकरांना लागली आहे. एकूण 33.5 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प ‘कुलाबा-वांद्रे-सिप्झ’ नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पासंदर्भात भाजप नेते विनोद तावडे यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये 24 जुलैपासून हा प्रकल्प सुरु होणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यानंतर ते ट्विट डिलिट केले. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कधी सुरु होणार? हा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

मेट्रो प्रकल्पात 27 स्टेशन

मागील महिन्यात रिसर्च डिजाइन एंड स्टँडर्ड्स ऑर्गनाइजेशन (आरडीएसओ) ने भूमिगत मुंबई मेट्रो लाइन 3 ची चाचणी केली होती. या प्रकल्पात 33.5 किलोमीटर लांब बोगदा आहे. मेट्रोचा हा प्रकल्प आरे कॉलनीपासून सुरु होतो. त्यात एकूण 27 स्टेशन आहे. त्यातील 26 स्टेशन बोगद्यात आहेत. 2017 पासून या प्रकल्पाचे काम सुरु झाले. परंतु कोरोनामुळे मध्यंतरी कामाला वेग मिळला नव्हता.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) हा प्रकल्प पूर्ण करत आहे. एमएमआरसीएल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी जपानकडून सहकार्य मिळाले आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास मुंबईकरांचा वेळ चांगलाच वाचणार आहे.

हे सुद्धा वाचा

विनोद तावडे यांनी केलेले ट्विट

मेट्रो प्रकल्पात ही स्टेशन

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, सीतलादेवी, धारावी, बीके , विद्यानगरी, सांताक्रूझ, देशांतर्गत विमानतळ, सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, सिप्झ एमआयडीसी आणि आरे डेपो हे स्टेशन आहे. मुंबई मेट्रो 3 मार्गावरील मेट्रो सेवा सकाळी 6.30 ते रात्री 11.00 वाजेपर्यंत असणार आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.