मेट्रोतून प्रवास करताना तिकीट काढण्यापासून सुटका, आता आली नवीन पद्धत

Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो स्थानकावर मिळणाऱ्या या बँडसाठी बॅटरीची गरज नाही. तो जलरोधक आणि टिकाऊ आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात तो वापरता येणार आहे. हा पट्टा धुता येणार आहे. तसेच तो स्वच्छही करता येणार आहे.

मेट्रोतून प्रवास करताना तिकीट काढण्यापासून सुटका, आता आली नवीन पद्धत
Metro
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 9:33 AM

राज्यात मुंबई, नागपूर अन् पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना एक चांगला वाहतुकीचा पर्याय मिळाला आहे. या शहरांमध्ये मेट्रो सेवा लोकप्रिय झाली आहे. मेट्रोकडून लोकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता मुंबईतील मेट्रोने नवीन तिकीट प्रणाली आणली आहे. कागदी तिकीट किंवा ई-तिकीटाला हा पर्याय निर्माण केला आहे. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून मेट्रो १ मधून प्रवास करता येणार आहे.

काय नवीन पर्याय

मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी नवीन पर्याय आला आहे. या मेट्रोत प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज नाही. त्याऐवजी मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) हा पर्याय आणला आहे. हा पट्टा स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ही सुविधा दिली आहे.

बँड २०० रुपयांना मिळणार

मेट्रोचे कागदी तिकीट खूपच लहान आहे. यामुळे ते हरवून जाते. त्याला पर्याय म्हणून अनेक जण मोबाईल ई तिकीट काढतात. परंतु त्यापेक्षा आणखी एक चांगला पर्याय आणला गेला आहे. ई तिकीट, व्हॉट्सअप तिकिट, पासेस यांना निर्माण केलेला हा चौथा पर्याय आहे. या पर्यायामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची झंझट होणार नाही. तसेच रांगेत उभे न राहावे लागत असल्याने वेळ वाचणार आहे. मनगटावरील बँड २०० रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे.

हे सुद्धा वाचा

सर्व स्थानकावर बँडची विक्री

मेट्रो १ च्या सर्व स्थानकावर हा बँड विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मनगटावरील बँड हा घड्याळाप्रमाणे आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना हा बँड स्कॅन करून आता प्रवास करता येणार आहे. या बँडची किंमत २०० रुपये आहे. तसेच त्यात टॉकअप करण्याची सुविधा असणार आहे. सोयीनुसार हा बँड रिचार्ज करून त्याचा वापर करता येणार आहे.

बॅटरीची गरज नाही, जलरोधक आणि टिकाऊ

मुंबईतील मेट्रो स्थानकावर मिळणाऱ्या या बँडसाठी बॅटरीची गरज नाही. तो जलरोधक आणि टिकाऊ आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात तो वापरता येणार आहे. हा पट्टा धुता येणार आहे. तसेच तो स्वच्छही करता येणार आहे. यामुळे त्वचेला कोणती इजा होणार नाही. हा बँड एमएमओपीएलने बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीने तयार केला आहे. त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करून केला आहे. प्रवाशांच्या पसंतीला हा पर्याय उतरणार आहे, असा विश्वास एमएमओपीएलकडून व्यक्त केला जात आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.