मुंबई : मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मेट्रोने आता सवलतीची योजना आणली आहे. प्रथमच मेट्रोकडून सवलत दिली जात आहे. या सवलतीमुळे प्रवाशांची चांगलीच बचत होणार आहेत. तसेच मेट्रोने अधिक प्रवासी प्रवास करणार आहे. मुंबई मेट्रोने ही सवलत आणली आहे. मुंबईची पहिल्या मेट्रोची प्रवाशांची संख्या मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 सुरु झाल्यानंतर वाढली आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या दोन स्थानकांची जोडणी मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या टप्पा क्रमांक दोनशी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचत आहे अन् त्यांना वाहतुकीचा चांगला पर्याय मिळाला आहे. तसेच रिक्षा तसेच टॅक्सी सेवेवर खर्च होणाऱ्या पैशात घसघशीत बचत झाली आहे.
‘मुंबई 1’ कार्ड वापरा
मेट्रोची लोकप्रियता पाहून मुंबई मेट्रोने एक सवलत योजना आणली आहे. प्रवाशांसाठी ‘मुंबई 1’ कार्ड आणले आहे. या कार्डचा वापर करुन मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष सुट मिळणार आहे. या कार्डनुसार 30 दिवसांच्या कालावधीत 45 वेळा मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 15 टक्के सुट मिळणार आहे. 60 वेळा प्रवास करणाऱ्यांना 20 टक्के सुट मिळणार आहे. ही सुट 30 दिवसांच्या कालावधीसाठी असणार आहे. यासाठी शुल्क ‘मुंबई 1’ कार्डच्या माध्यमातून आकरण्यात येणार आहे.
अनलिमिटेड करा प्रवास
मुंबई मेट्रोच्या माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणी जाणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी ‘अनलिमिटेड ट्रिप पास’ची ही योजनाही आणली आहे. एका दिवसाच्या अनलिमिटेड प्रवासासाठी 80 रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच 3 दिवसांच्या अमर्यादित ट्रिप पासची फी 200 रुपये असणार आहे.
कुठे मिळणार कार्ड
मुंबई 1 कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काउंटर आणि ग्राहक सेवा काउंटरवर मिळणार आहे. ‘मुंबई 1’ तुमच्या ओळखीच्या कागदपत्रासह सहजपणे मिळवू शकतात आणि रिचार्ज करू शकतात. तसेच या कार्डचा वापर बेस्ट बसमध्येही करता येणार आहे. या कार्डद्वारे सोमवार ते शनिवारपर्यंत पाच टक्के तर रविवारी व राष्ट्रीय सुटी असताना दहा टक्के सुट मिळणार आहे.
अशा आहेत सवलती