मेट्रो प्रवाशांसाठी चांगली बातमी, तिकीट काढण्याची पद्धत बदलली

Mumbai Metro | घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर ही राज्यातील पहिली मेट्रो मार्गिका अखेर राज्य सरकारमार्फत एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. मार्गिका खरेदी करण्याला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे पाच वर्षांपासून भिजत घोंगडे असलेला हा निर्णय अखेर मार्गी लागला आहे.

मेट्रो प्रवाशांसाठी चांगली बातमी, तिकीट काढण्याची पद्धत बदलली
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 8:21 AM

अविनाश माने, मुंबई | दि. 12 मार्च 2024 : मुंबई आणि पुणे शहरात मेट्रो सुरु आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रोने नवीन सुविधा केली आहे. यामुळे मुंबईकरांना वारंवार तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागणार आहे. आता मेट्रोच्या सर्व मार्गांचे एक तिकीट मिळणार आहे. सध्या मुंबईत मेट्रो १ शिवाय मेट्रो २ अ व मेट्रो ७ (गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर) या मेट्रो मार्गिका सुरू आहेत. मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका एमएमआरडीएकडे असल्याने त्या मार्गाचे संयुक्त तिकीट काढता येते. परंतु मेट्रो १ ही मार्गिकेसाठी वेगळे तिकीट काढावे लागत होते. आता मात्र सर्व मार्गांचे एकच तिकीट मिळणार आहे.

आता एकाच तिकिटावर प्रवास

मेट्रो १, मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिकांना गुंदवली व अंधेरी पश्चिम या स्थानकाजवळ संलग्न होते. मात्र तसे असतानादेखील मेट्रो १ चे तिकीट स्वतंत्र काढावे लागते होते. आता ही मार्गिका एमएमआरडीएकडे आल्यानंतर घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर व गुंदवली ते अंधेरी पश्चिम या तिन्ही मार्गिकांवरील स्थानकांचे एकत्रित तिकीट प्रवाशांना काढता येईल.

घाटकोपर वर्सोवा मार्गिका राज्य सरकार घेणार

घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर ही राज्यातील पहिली मेट्रो मार्गिका अखेर राज्य सरकारमार्फत एमएमआरडीएच्या ताब्यात येणार आहे. मार्गिका खरेदी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे पाच वर्षांपासून भिजत घोंगडे असलेला हा निर्णय अखेर मार्गी लागला आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकल उशिराने धावत आहे. तांत्रिक अडचणीमुळे कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्वच लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत आहेत. पहाटे रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमाने उशिराने कार्यालयात पोहचत आहे.

हे ही वाचा

काळजाचा ठोका चुकला, मुंबईत रेल्वे पटरी वाकडी झाली, समोरुन लोकल आली अन्…पाहा Video

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.