Mumbai Monsoon : मुंबईत वयस्क जोडप्याने रिक्रीए केले ‘रिम झिम गिरे सावन’, सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
'मंजिल' जुन्या हिंदी चित्रपटातील भिजलेली जुनी मुंबई दाखविणारे 'रिम झिम गिरे सावन' हे गीत नक्कीच सर्वांना मुंबईची भुरळ घालते. एका जोडप्याने हे हिंदी गीत रिक्रीए केले असून ते सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
मुंबई : मुंबई – कोकण आणि देशभरातील बहुतांशी राज्यात मान्सून उशीरा का होईना पण दाखल झाला आहे. मान्सूनच्या धारांमध्ये सृष्टीत नवचैतन्य जणू पसरले आहे. आणि या कोसळत्या धारा अंगावर झेलण्यासाठी मुंबईकर आता निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसले आहेत. गेला रविवार आणि हा रविवार गेटवे चिंब भिजण्यासाठी मुंबईकर जमू लागले आहेत. हिंदी चित्रपटात प्रेम, विरह आणि खून-मारामारी अशा विविधांगी दृश्यांसाठी दिग्दर्शकांनी मुंबईच्या पावसाचा वापर केला आहे. गेटवेतील समुद्राच्या फेसाळत्या रौद्र लाटा, रस्त्यावर धावणाऱ्या बेस्टच्या बसेस आणि चिंब भिजणारे बिग बी अमिताभ आणि मौसमी चटर्जी यांचे ‘रिमझिम गिरे सावन’ हे गीत यावेळी हटकून आठवते. हे गीत एका जोडप्याने रिक्रीए केले आहे. सोशल मिडीयावर ते खूपच व्हायरल होत आहे.
मुंबईच्या पाऊसाचा वापर हिंदी चित्रपटात अनेक जणांनी केला आहे. अगदी अलिकडे राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटात मुंबईतला रिपरिपणारा पाऊसच एक व्हीलन वाटतो, तर ‘मंजिल’ जुन्या हिंदी चित्रपटातील भिजलेली जुनी मुंबई दाखविणारे ‘रिम झिम गिरे सावन’ हे गीत नक्कीच सर्वांना मुंबईची भुरळ घालते. बेल बॉटम पॅण्ट घातलेले बिग बी आपल्या लांब लंचक ढेंगाने पावसाचे पाणी उडविताना पाहून मजा वाटते. मंजिल चित्रपटातीली रिम झिम गिरे सावन हे गीत एका जोडप्याने त्याच गेटवे, मरिन ड्राईव्ह आणि ओव्हल मैदान येथे जाऊन रिक्रीए केले आहे. त्याच्या या व्हिडीओला ट्वीटरवर एका युजरने शेअर केले आहे.
हेच ते रिक्रीए गीत पाहा..
Kudos to this couple for recreating Rim Jhim gire sawan. I had a huge grin on my face all through. #whatsappforward pic.twitter.com/6f7SAiqYk5
— Arun Panicker (@panix68) July 2, 2023
गीतकार योगेश गौंड यांनी लिहीलेले आणि आर.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले आहे. योगेश गौंड यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. योगेश गौड यांनी अनेक सुपरहीट गीते लिहीली आहेत. त्यात आनंद चित्रपटातील कहीं दूर जब दिन ढल जाय, जिंदगी कैसी है पहेली, कई बार यू भी देखा हैं, अशी सदाबहार गाणी हृषिकेश मुखर्जी आणि बसु चटर्जी यांच्यासाठी लिहीली आहेत. गीतकार योगेश यांचे 77 व्या वर्षी 29 मे 2020 रोजी निधन झाले. त्यांनी मिली (1975), मंजिल (1979), छोटी सी बात (1975), रजनीगंधा (1974) या चित्रपटांसह अनेक हृदयास स्पर्श करणारी गाणी लिहीली आहेत.