54 वा मजला… किंमत 123 कोटी रुपये…कोणी घेतला मुंबईत आलिशान फ्लॅट

Oberoi Realty’s Three Sixty West Project: उत्पल सेठ यांनी नुकतेच मुंबईतील सर्वाधिक महागड्या असलेल्या वरळीत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. 'ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट' नावाच्या इमारतीत त्यांनी हे अपार्टमेंट खरेदी केले आहे. ही इमारत वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर आहे.

54 वा मजला... किंमत 123 कोटी रुपये...कोणी घेतला मुंबईत आलिशान फ्लॅट
ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 11:01 AM

मुंबईत महागड्या फ्लॅटची विक्री झाली आहे. तब्बल 123 कोटी रुपयांमध्ये या फ्लॅटची खरेदी झाली आहे. यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे सहयोगी राहिलेले उत्पल शेठ यांनी हा फ्लॅट घेतला आहे. राकेश झुनझुनवाला यांची कंपनी रेयर एंटरप्राइजेजचे ते सीईओ आहेत. हा फ्लॅट वरळीतील ‘ओबेरॉय थ्री सिक्सटी वेस्ट’ मधील बिल्डिंगमध्ये आहे. राकेश झुनझुनवाला जिवंत असताना उत्‍पल सेठ त्यांचे राइट हँड म्हणून ओळखले जात होते.

7.40 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क

उत्पल सेठ यांनी नुकतेच मुंबईतील सर्वाधिक महागड्या असलेल्या वरळीत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट’ नावाच्या इमारतीत त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे. ही इमारत वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर आहे. या फ्लॅटची किंमत 123 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीत 54 व्या मजल्यावरहा फ्लॅट आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 15,795 चौरस फूट आहे. यात 884 स्क्वेअर फुटांच्या मोठ्या बाल्कनी आहे. शेठ यांनी त्यांच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांसह हा फ्लॅट घेतला आहे. हा करार 15 सप्टेंबर रोजी झाला होता. त्यासाठी 7.40 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे ही इमारत

फ्लॅट ‘स्कायलार्क बिल्डकॉन’ आणि ‘सहना ग्रुप’च्या ‘मून रे रियल्टी’कडून खरेदी करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या ‘ओएसिस रियल्टी’सोबत एकत्र काम करतात. ‘ओएसिस रियल्टी’ने ‘ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट’ विकसित केले आहे. या करारांतर्गत शेठला ‘ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट’ येथे सात पार्किंग स्लॉटही मिळाले आहेत. टॉवर ए मध्ये 66 मजले आहेत. 28 फ्लॅटआहेत. तर टॉवर बी मध्ये 90 मजले आहेत.

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट

शाहिद कपूरने घेतले घर

ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्टमध्ये अभिनेता शाहिद कपूर यानेही या ठिकाणी घर घेतले आहे. तसेच रेडियंट लाइफ केअरचे अभय सोई आणि इंडसइंड बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक रोमेश सोबती हे आलिशान घरे खरेदी करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये आहेत.

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.