भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना उद्धव ठाकरे मतदान करणार? कारण…
Mumbai North Central Lok Sabha constituency ujjwal nikam: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत आणि विकास कामे पाहून राजकारणात येण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. याआधी त्यांनी वकील म्हणून उत्तम काम केलेले आहे. आता ते राजकारणाच्या नवीन भूमिकेतही नक्की यश मिळवतील.
राज्यातील, देशातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खटले गाजवणारे प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम राजकारणात उतरले आहेत. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जन्मभूमी असलेल्या जळगाव ऐवजी कर्मभूमी मुंबई निवडली आहे. मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा जागेवरुन भारतीय जनता पक्षातून ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत. उत्तम मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहे. त्यात विले पार्ले,चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना यांचा समावेश आहे. हायप्रोफाईल लोकांच्या या मतदार संघात उज्ज्वल निकम उमेदवार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे या मतदार संघात मतदार आहेत. ते भाजपचे असलेल्या उज्ज्वल निकम यांनी मतदान करतील, असा विश्वास उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम यांनी व्यक्त केला.
उज्ज्वल निकम म्हणतात…
माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा प्रसंग आहे. मी बाप्पाच्या आशीर्वादाने आज उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहे. राजकारणात येईल, असे मला कधीही वाटले नव्हते. मोदीजी यांच्या विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरे जात आहे. लोकांचं मोदी सरकारवर प्रेम दिसत आहे. यामुळे मला विजयाचा विश्वास आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे मतदान करणार- अनिकेत निकम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत आणि विकास कामे पाहून राजकारणात येण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. याआधी त्यांनी वकील म्हणून उत्तम काम केलेले आहे. आता ते राजकारणाच्या नवीन भूमिकेतही नक्की यश मिळवतील. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आमचे मतदार आहेत. त्यांनीही ही मोदीजींनी केलेल्या विकासाच्या मुद्यावर निकम साहेबांना मतदान करावे, असे मी आवाहन करत असल्याचे अनिकेत निकम यांनी म्हटले.
राजकारणही अव्वल ठरणार
उज्ज्वल निकम यांच्या पत्नी ज्योती निकम यांनी सांगितले की, साहेबांनी वकील म्हणून आजवर मोठी कामे केली आहेत. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ती कामे केलेली आहेत. आम्ही आनंदी आहोत की हा क्षण आमच्या कुटुंबासाठी आला. ते राजकारणही अव्वल ठरतील, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या मतदान केंद्राची जागा काँग्रेसला
उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सुटली. महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात ही फक्त एक जागा मात्र आहे. मात्र, उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा जो वारसा सांगतात, तो अडचणीत आणणारी ही जागा ठरणार आहे. कारण उद्धव ठाकरे यांचे मतदान उत्तर मध्य मुंबई या मतदान केंद्रात आहे. याच लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे मतदार आहेत. या ठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. आघाडी धर्माचे पालन करत ठाकरेंना कॉंग्रेसला मतदान करावं लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच मुद्द्यावर ठाकरेंना घेरले आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या विचाराशी ठाकरेंनी तडजोड केल्याची टीका वारंवार होत होती. आता मात्र, ठाकरे काँग्रेसला मतदान करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. यामुळं ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची, त्यांना हिंदुत्त्वाच्या लाईनने शिंदे गटाकडे लोकांना खेचण्याची संधी फडणवीस वाया जावू देणार नाहीत हे निश्चित मानलं जातंय.
बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटेल?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, “हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस कधीही होऊ देणार नाही आणि तशी वेळ आली तर माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन. मात्र, आता त्यांचेच चिरंजीव काँग्रेसला मतदान करणार आहेत. उद्धव ठाकरे यांची एक पत्रकार परिषद मी पाहत होते. त्यामध्ये ते हसून सांगत होते की, उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. आता हे ऐकून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला काय वाटलं असेल”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वर्षा गायकवाडांना उमदेवारी
मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट दिले. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान या मतदारसंघात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार आहेत. या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे गेल्याचा फायदा भाजपला होत आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांना म्हणजे काँग्रेसला मतदान करणार असल्याचा उल्लेख केला होता. यावरूनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे-फडणवीस आमने सामने
लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरुये. ठाकरे विरुद्ध फडणवीसांची जोरदार जुगलबंदी रंगलीये. पुण्याच्या सभेत ठाकरे फडणवीसांवर घसरले. फडणवीसांचा उल्लेख टरबूज असा केला. यावर फडणवीसांनीही जोरदार पलटवार केला होता, “नेहमी बडबड करणाऱ्यांची जागा कुठं असते.” हे मी वेगळं सांगितलं पाहिजे का असा सवाल त्यांनी केला. ठाकरे फडणवीसांच्या या वादानं आता नवीन वळण घेतलंय. उत्तर मध्यचं तिकीट सुरु आहे.पुण्याच्या सभेत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना पुरतं घेरलं आहे. ठाकरेंनी हिंदूत्त्व सोडल्याची वारंवार टीका भाजप आणि शिंदे गटाकडून होते आहे. यामागे ठाकरेंना मानणाऱ्या हिंदूत्त्ववादी मतांना आकर्षित करण्याची रणनिती आहे. शिवाय भाजप आणि शिंदे गटाची मोट यातून बांधली जाते आहे. ठाकरे कॉंग्रेसला मतदान करणार हे नरेटिव्ह भाजपच्या पथ्यावर पडणारं आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून फडणवीसांनी ही टीका केलीये. त्यामुळं या टिकेला जास्तीचं वजन मिळतं आहे.
खुर्चीसाठी हिंदूत्त्वाशी तडजोड?
ठाकरेंनी खुर्चीसाठी हिंदूत्त्वाच्या विचारांशी तडजोडी केली ही टीका फडणवीसांकडून होते. “बाळासाहेब ठाकरे यांचे नाव एकीकडे घ्यायचे आणि त्यांच्या विचाराशी प्रातरणा करायची. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असतील. पण विचाराचे मालक हे एकनाथ शिंदेच आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, “खरं म्हणजे खुर्चीसाठी ऱ्हास झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव एकीकडे घ्यायचे आणि त्यांच्या विचाराशी प्रातरणा करायची. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असतील. पण विचाराचे मालक हे एकनाथ शिंदेच आहेत. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.