मोठी बातमी! ठाकरे गटाच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांच्या तब्बल 23 अटी

ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाला अखेर मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. पण या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल 23 अटी-शर्ती ठेवल्या आहेत. ठाकरे गटाला या अटी-शर्तींचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या मोर्चासाठी मुंबई पोलिसांच्या तब्बल 23 अटी
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 7:52 PM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून उद्या 1 जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कारण ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. संबंधित घटनेमुळे पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत मोर्चाला परवानगी नाकारली होती. पण नंतर ठाकरे गटाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी हमी देण्यात आली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी द्यावी, यासाठी ठाकरे गटाकडून पोलिसांना निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी तब्बल 23 अटीशर्ती ठेवून मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

मुंबई महापालिकेत गेल्या दीड वर्षांपासून कोणत्याही पक्षाची सत्ता नाही. या दरम्यानच्या काळात महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने थेट शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गट याच मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरण्यासाठी 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे.

या मोर्चासाठी ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरु होती. अखेर उद्या ठाकरे गटाचा हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी 23 अटी ठेवल्या आहेत. त्यांचं पालन करणं ठाकरे गटासाठी बंधनकारक असणार आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या महत्त्वाच्या अटीशर्ती

1) मेट्रो सिनेमागृह ते मुंबई पालिका मार्गावरुन ठाकरे गटानं मोर्चा काढावा 2) ठाकरे गटानं शांततेत मोर्चा काढावा, मोर्चाचा मार्ग न बदलण्याच्या पोलिसांच्या सूचना 3) मोर्चाच्या ठिकाणी शस्त्र, तलवारी, लाठी आणि पुतळे बाळगू नयेत 4) धार्मिक, राजकीय आणि सामाजिक भावना दुखावतील असे बॅनर, प्रतिमा नकोत. 5) मोर्चाच्या दरम्यान हुल्लडबाजी, असभ्यवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी 6) ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादीत असावा 7) मोर्चामध्ये येणाऱ्या वाहनांना दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याची परवाणगी. 8) मोर्चाच्या ठिकाणी पुरेशे अग्निशमन दल हजर राहील याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. 9) मोर्चाच्या ठिकाणी रूग्णवाहीकेची व्यवस्था करावी. 10) महिला सुरक्षेबाबत खबरदारी घेऊन महिलांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी. 11) मोर्चासाठी स्वयंसेवक नेमण्यात यावेत. 12) मोर्चात कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये. 13) अत्यावश्यक सुविधांना अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. 14) मोर्चाच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. 15) अचानक उद्भवलेल्या आणि उद्भवनारी परिस्थिती पाहून मोर्चा रद्द करण्याचा अधिकार, परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना राहील. 16) सर्व अटी आणि शर्तींचे पालन लोकांकडून होईल, याची काळजी आयोजकांनी घ्यावी. 17 मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी आयोजकांची असणार.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.