मुंबईत 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्ह्याची नोंद

संचारबंदी दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात (Mumbai police on Tablighi) सहभागी होऊनही त्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 150 तब्लिगींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत 150 तब्लिगींवर गुन्हा दाखल, माहिती लपवल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात गुन्ह्याची नोंद
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 6:57 PM

मुंबई : संचारबंदी दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात (Mumbai police on Tablighi) सहभागी होऊनही त्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 150 तब्लिगींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांत कलम 188, 269 आणि 270 अंतर्गत 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Mumbai police on Tablighi).

मुंबई महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार रोग पसरवण्यास मदत केल्याप्रकरणी, संचारबंदी असून कार्यक्रमात उपस्थित राहिल्याप्रकरणी आणि कार्यक्राला उपस्थित राहूनही माहिती लपविल्याप्रकरणी 150 तब्लिगींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू असताना दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तब्लिगी जमातचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशभरातून तब्लिगी जमातचे शेकडो नागरिक गेले होते. महाराष्ट्रातून तब्बल 1400 च्या जवळपास नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले. यापैकी 150 जण मुंबईतील होते. या कार्यक्रमात विदेशातूनही अनेक जण आले होते.

या कार्यक्रामादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला आणि कोरोनाचा विळखा वाढला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सरकारने कोरोनाची तपासणीसाठी समोरुन पुढे येण्याची विनंती केली आहे. मात्र, अनेकजण सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत. याशिवाय क्वारंटाईन करण्यात आलेले तब्लिगी वैद्यकिय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता कठोर पावलं उचलली जात आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे ‘कोरोना’संसर्गाचा वेग दुप्पट झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी दिली होती. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा सध्याचा काळ 4.1 दिवस इतका आहे, मात्र तब्लिगीचा कार्यक्रम नसता तर 7.4 दिवस इतका कालावधी अपेक्षित होता.

संबंधित बातमी : नगरमध्ये जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं तब्लिगींना आवाहन

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.