सदा सरवणकर गोळीबार प्रकरण, पोलीस तपासात मोठी माहिती समोर, कुणावर कारवाई होणार?

सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याची माहिती याआधीच समोर आलेली. पण पोलीस तपासातून आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

सदा सरवणकर गोळीबार प्रकरण, पोलीस तपासात मोठी माहिती समोर, कुणावर कारवाई होणार?
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 5:32 PM

मुंबई : मुंबईत प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झालेला. या राड्यात गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलेला. आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलेला. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येतेय. आता या गोळीबार प्रकरणाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणावर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय. पण पोलीस तपासातून सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे गोळीबार झाला ही घटना खरी असल्याचं तपासातून स्पष्ट करण्यात आलंय.

दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचं समोर आलेलं. त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झालेला. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पण आतापर्यंत पोलीस तपासातून एक गोष्ट समोर आलीय, ती म्हणजे त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून हा निष्कर्ष निघालेला आहे.

हे सुद्धा वाचा

सदा सरवणकर यांना क्लीनचीट

विशेष म्हणजे या प्रकरणाचा बॅलेस्टिक अहवाल आलेला होता. त्यामध्ये बंदुकीतून गोळीबार झाला असल्याचा रिपोर्ट देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आता आमदार सदा सरवणकर यांना क्लीनचीट दिलेली आहे. सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला पण तो त्यांनी स्वतः केला नसल्याचा निष्कर्ष पोलिसांचा आहे. या तपासाची माहिती विधानसभेतसुद्धा पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. पोलिसांनी या प्रकरणी सदा सरवणकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सरवणकर यांच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली होती.  बंदुकीसोबतच बंदुकीतून निघालेले काडतूसे आणि घटनास्थळावरून काही नमुने जप्त करण्यात आले होते. याची बॅलेस्टिक तज्ज्ञांनी चौकशी केली. त्याचा अहवाल या तज्ज्ञांनी तयार केला आहे. या अहवालानुसार सरवणकर यांच्या बंदुकीतूनच गोळी सुटल्याचं स्पष्ट झालं होतं. याच प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु होता. अखेर या प्रकरणी सदा सरवणकर यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.