शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स, पूजा म्हणते, ‘माझी तब्येत बरोबर नाही, नंतर येते!’

  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे.

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांचं समन्स, पूजा म्हणते, 'माझी तब्येत बरोबर नाही, नंतर येते!'
मुंबई पोलिसांचं पूजा ददलानीला समन्स
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 2:14 PM

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे.

हॅकर मनीष भंगाळेचे दावे आणि गौप्यस्फोट

यापूर्वी, एका सायबर तज्ञाने आणि हॅकरने दावा केला होता की, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यासाठी पूजा ददलानीसह काही लोकांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स एडिट करण्यासाठी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनीष भंगाळे असे या हॅकरचे नाव आहे. दाखवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाइल आर्यन खानच्या नावावर असल्याचा दावा भंगाळे यांनी केला होता.

प्रभाकर साईलच्या नावाने बनावट सिमकार्ड बनविण्यास सांगितले होते, असा मोठा दावा हॅकर मनीष बंगाळेने केला होता. जळगावात 6 ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या दोघांनी माझ्याशी संपर्क साधला होता. यासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफरही देण्यात आली होती तसंच जबरदस्तीने 10 हजार रुपयेही देण्यात आले होते, असे दावे भंगाळेंनी केले होते.

मनीष भंगाळेंचं अमित शहा, वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये प्रभाकर साईलबद्दलच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनीष भंगाळे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मनीष भंगाळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे.

भंगाळे म्हणाले, आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या या दोघांनी मला सांगितले की, तू भारतातील प्रसिद्ध हॅकर आहेस. तुमच्याकडे आमचं एक विशेष काम आहे. त्यांनी मला काही नंबर दिले आणि सांगितले की आम्हाला त्यांचा सीडीआर हवा आहे. त्या सर्व क्रमांकांपैकी एक नंबर पूजा ददलानी या नावाने सेव्ह करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअ‍ॅप चॅटची बॅकअप फाईल दाखवली आणि त्या फाईल्स एडिट करण्यास सांगितल्या. त्यानंतर त्यांनी मला एक मोबाइल नंबर दिला आणि या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं आणि जेव्हा मी तो नंबर ट्रूकॉलरवर पाहिला तेव्हा हा नंबर काही सॅमचा होता.

हे ही वाचा :

तुरुंगातून सुटल्यानंतर आर्यन खान काय वाचतोय?; स्वीडिश लेखकाचं हे पुस्तक माहीत आहे काय?

Mannat | शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’च्या नावामागे ही एक अनोखी कथा, तुम्हाला माहितीये का?

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.