मुंबई: अतिधोकादायक इमारतींचे मुंबई पालिकेकडून (BMC) वीज-पाणी कापण्यात आलंय. त्याचबरोबर तब्बल 117 इमारती रिकाम्या केल्या गेल्यात.पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याआधी मुंबईतील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. यानुसार मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण (Survey) करून अतिधोकादायक इमारतींची (Buildings) यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये मोठी दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींचा समावेश ‘सी-2’ करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येतात, तर जीर्ण झालेल्या इमारतींचा समावेश ‘सी-1’ म्हणजेच ‘अतिधोकादायक’ श्रेणीत करून या इमारती तत्काळ रिकामी करण्याचे निर्देश देण्यात येतात.
नोटीस बजावूनही या इमारती रिकाम्या न केल्यास वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येते. दरम्यान, दुर्घटना करण्यासाठी मुंबईतील 30 झुकल्यासारखे दिसणे वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे इमारतीचा तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.