PM Narendra Modi: मोदी आज मुंबईत! लता मंगेशकर पुरस्कारानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार गौरव, राजही येणार?

यंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उषाताई मंगेशकर यांच्याकडे असेल. पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या हस्ते गौरवान्वित केले जाईल. यंदाचा हा कार्यक्रम मुंबईत होणार असून येत्या 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

PM Narendra Modi: मोदी आज मुंबईत! लता मंगेशकर पुरस्कारानं उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार गौरव, राजही येणार?
पहिला लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान 24 एप्रिल रोजी मुंबईत येणार Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 6:25 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडले असं सांगितलं जातंय. तसंच या सोहळ्याचा राज ठाकरेही उपस्थित राहणार का, याकडेही सगळ्यांची नजर लागली आहे. गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रदान केला जाणार आहे. याकरिता नरेंद्र मोदी स्वतः आज मुंबईत या पुरस्कार (Lata Mangeshkar Award) वितरण सोहळ्याला हजेरी लावतील. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतंच फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मंगेशकर कुटुंबीयांनी केली असून याचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे. आज लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 80 वी पुण्यतिथी असून त्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मंगेशकर परिवार आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने जारी केलेल्या एका पत्रकातून ही माहिती देण्यात आली होती.

मंगेशकर कुटुंबीयांचे निवेदन काय?

पुरस्कारांच्या संदर्भाने मंगेशकर कुटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,

‘ या वर्षी गुरु दीनानाथ मंगेशकर यांचा 80 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने आम्ही प्रथमच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची स्थापना करून त्याचे वितरण करणार आहोत. हा पुरस्कार दरवर्षी आपला देश, नागरिक आणि समाजासाठी पथदर्शक, शानदार आणि आदर्शप्रत योगदान दिले आहे, अशा व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाईल.’

त्यामुळे या पहिल्या पुरस्कारासाठी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील, हे सांगताना आम्हाला अधिक अभिमान वाटतोय. ते एक आंतरराष्ट्रीय राजकीय नेते असून भारताला त्यांनी जागतिक नेतृत्वाची दिशा दिली आहे. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात जी उत्तम प्रगती सुरु आहे, तिची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळालेली आहे. या महान देशाच्या गौरवशाली इतिहासाच्या हजारो वर्षांमधील ते महान नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यास आमचे कुटुंब आणि ट्रस्ट त्यांचा आभारी राहिल. ‘

आज नरेंद्र मोदी मुंबईत

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान , पुणे ही एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट असून याद्वारे मागील 32 वर्षांपासून समाजकार्य केले जाते. संगीत, नाटक, कलेतील व्यावसायिक व दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान या ट्रस्टद्वारे केला जातो. दरवर्षी 24 एप्रिल म्हणजेच मास्टर दीनानाथजींच्या स्मृती दिनी हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

यंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुश्री उषाताई मंगेशकर यांच्याकडे असेल. पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या हस्ते गौरवान्वित केले जाईल. यंदाचा हा कार्यक्रम मुंबईत होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

इतर बातम्या- 

Video : चिमुकल्याचं मांजर प्रेम, व्हीडिओ पाहून म्हणाल, “मैत्री असावी तर अशी…!”

Chandrapur Leopard : चंद्रपुरात थंड हवेसाठी अंगणात झोपला; बिबट्याने 70 वर्षीय व्यक्तीस उचलून नेले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.