मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांमध्ये लसीकरणास परवानगी, नियम काय?

मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. (Mumbai company and housing society covid vaccination)

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, गृहनिर्माण संस्थांसह कंपन्यांमध्ये लसीकरणास परवानगी, नियम काय?
Corona Vaccine
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 11:24 AM

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम युद्धपातळीवर राबवली जात आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची लोकसंख्या कोट्यावधींच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खासगी कामाच्या ठिकाणी आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (mumbai private company and housing society get permission for covid vaccination)

लसीकरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपनी आता मुंबईतील लसीकरण केंद्राशी करार करू शकतील. त्यासाठी पालिकेने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक सूचनाानुसार गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांना स्वत: लस खरेदी कराव्या लागतील. त्यानतंर लसीकरण शिबीर घ्यावे लागेल.

इतकंच नव्हे तर कामाच्या ठिकाणी लसीकरण शिबीर भरवता येतील. मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्रे आणि गृहनिर्माण संस्था / कंपनी या दोघांना संयुक्तपणे डोसची किंमत ठरवावी लागेल. या कंपनीत / गृहनिर्माण संस्था आणि खाजगी रुग्णालयात समन्वय साधणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जर लसीकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर अशाप्रकारे आणखी डोर-टू-डोर लसीकरण अभियान सुरू केले जातील. या शिबिरांतील रुग्णांची जबाबदारी गृहनिर्माण संस्था आणि कंपनीची असेल.

भाजप खासदाराचे पालिका आयुक्तांचे पत्र

दरम्यान मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याची मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. मनोज कोटक यांनी गुरुवारी 29 एप्रिलला याबाबतचे एक पत्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना लिहिले होते. यात मनोज कोटक यांनी पालिकेच्या सहकार्याने स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय सुविधेसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. (mumbai private company and housing society get permission for covid vaccination)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळणार, पालिका लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Corona Cases | मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर

जागतिक पातळीवरुन लस खरेदीसाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली, पडताळणी करण्याच्या आदित्य ठाकरेंच्या सूचना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.