Mumbai Railway Megablock : रेल्वेचा मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Megablock news : रविवारी १ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अप धिम्या आणि डाऊन धिम्या मार्गावर हा मेगाब्लॉक घेतला जाईल. याकाळात लोकल उशिराने धावतील. त्यामुळे वेळेचे नियोजन करुनच घराबाहेर पडा.

Mumbai Railway Megablock : रेल्वेचा मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 7:20 PM

मध्य रेल्वेकडून १ सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येऊन शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येऊन गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ पर्यंत सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील सेवा मुलुंड येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येऊन आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

डाउन धीम्या लाइनवर:

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३२ वाजता सुटेल.

अप धीम्या लाइनवर:

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी १०.२७ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ठाणे येथून सायंकाळी ०४.०३ वाजता सुटेल. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालतील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाउन हार्बर मार्गावर:

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर:

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता पनवेल येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटेल.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.