मुंबईत रेल्वे स्थानकांवर आणखी 49 पादचारी पूल, प्रवाशांचे अपघाती मृत्यू कमी होण्यास मदत होणार
भारतीय रेल्वेने आतापर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकांना अनेक पडचरी पुल बांधले आहेत. त्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्रात अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. आता, मुंबईला आणखी 49 पडचरी पुल मिळणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक मदत होईल.
मुंबईः वेळ वाचवण्यासाठी आणि वेळेवर ट्रेन पकडण्यासाठी लोक रेल्वे रूळ ओलांडतात हे मुंबईत सामान्य आहे. परंतु, हे अत्यंत धोकादायक आहे आणि यामुळेच मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्र अपघाती मृत्यूंमध्ये भारतात सर्वाधिक आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकांना अनेक पादचारी पुल बांधले आहेत. त्यानंतर गेल्या 5 ते 6 वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वे क्षेत्रात अपघाती मृत्यू कमी झाले आहेत. आता, मुंबईला आणखी 49 पादचारी पुल मिळणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक मदत होईल. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) हाती घेतला आहे.
49 पादचारी पुलांपैकी 28 मध्य रेल्वेवर असतील (हार्बर लाईनसह) आणि आणि 21 पश्चिम रेल्वेवर असतील. MRVC द्वारे बांधण्यात येणार्या एकूण नवीन पुलांपैकी 33 पुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित पुलांचे काम सुरू आहे.
पदचरी पुलाचा विस्तार करण्याचे आदेश
3 वर्षांपूर्वी एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, सरकारने रेल्वेला सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांवर पादचारी पुलाची रुंदी वाढवण्याचे आदेश दिले. तर काही स्थानकांवर जेथे विस्तार करणे शक्य नव्हते तेथे नवीन पूल बांधले जात आहेत. एल्फिस्टन स्थानकाच्या जीवघेण्या घटनेनंतर, रेल्वेनेही नवीन पादचारी पुलांवर लिफ्टचीही सुविधा सुरू केली आहे, जेणेकरून पायऱ्यांवरील गर्दी कमी होईल. आत्तापर्यंत माटुंगा रोड स्टेशन, कुर्ला/टिळक नगर आणि मुलुंड स्टेशनवर लिफ्ट बांधण्यात आल्या आहेत. तर काही स्थानकांवर एस्केलेटरही बांधण्यात आले आहेत.
अधिक पदचरी पुलमुळे रेल्वे ट्रॅकवरील मृत्यू कमी होतील
मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात दररोज सुमारे 80 लाख लोक प्रवास करतात. जे ट्रेन्स आणि रेल्वे प्लॅटफॉर्मच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. या गर्दीत, लोकं वेळ वाचवण्यासाठी बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडतात, आणि आपला जीव धोक्यात घालतात. 2010 ते 2019 या कालावधीत मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात सरासरी 3,800 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 2013 ते 2018 या कालावधीत मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे क्षेत्रात 2,515 लोकांचा फक्त रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. मात्र, अधिक रेल्वे पुलांमुळे गेल्या काही वर्षांपासून हा मृत्यूंचा आकडा कमी होत आहे. अधिक पादचारी पुलांमुळे प्रवाशांची सोय होईल.
2012 च्या निरीक्षणानुसार, ज्या स्थानकांमध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगमुळे जास्त मृत्यू झाले ते म्हणजे- कुर्ला, कांजूरमार्ग, ठाणे, ठाकुर्ली, कल्याण, दादर, कांदिवली, बोरिवली, भाईंदर, वसई रोड आणि नालासोपारा.
इतर बातम्या