काळजाचा ठोका चुकला, मुंबईत रेल्वे पटरी वाकडी झाली, समोरुन लोकल आली अन्…पाहा Video

Mumbai Mira Road Railway Station: मुंबईत रेल्वे रुळावरुन गाडी जात असताना तिचे डब्बे हालत असल्याचे दिसले. ती ट्रेन गेल्यानंतर मजुरांनी रेल्वे पटरी पाहिली. त्यावेळी रेल्वे पटरी वाकडी झाल्याचे रेल्वे मजुरांच्या लक्षात आले.

काळजाचा ठोका चुकला, मुंबईत रेल्वे पटरी वाकडी झाली, समोरुन लोकल आली अन्...पाहा Video
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 1:04 PM

मुंबई | दि. 11 मार्च 2024 : मुंबईमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मिरारोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. मिरा रोड स्थानकावर रेल्वे पटरी वाकडी झाली होती. ट्रॅकवरुन एक एक्स्प्रेस ट्रेन गेली. त्यावेळी गाडीचे डब्बे हालत असल्याचे दिसले. ती ट्रेन गेल्यानंतर मजुरांनी रेल्वे पटरी पाहिली. त्यावेळी रेल्वे पटरी वाकडी झाल्याचे रेल्वे मजुरांच्या लक्षात आले. त्यानंतर ही घटना वरिष्ठांना कळवण्यात आली. पुढे जे काही घडले त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वे पटरी वाकडी झाल्याची घटना मजुरांच्या लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती.

नेमके काय घडले

मिरारोड रेल्वे स्थानकावरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर रविवारी दुपारी चार वाजता एक एक्सप्रेस गेली. ती गाडी जात असताना तिचे कोच हालत होते. त्यामुळे रेल्वे मजूर ती पटरी असलेल्या ठिकाणी पोहचले. रेल्वे कामगार पाहण्यासाठी गेले असता रेल्वे पटरी वाकडी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर ही घटना वरिष्ठांना कळवण्यात आली. घटनास्थळी त्वरीत रेल्वे पोलीस दलाचे जवान आले.

हे सुद्धा वाचा

लोकलमधून येणाऱ्या प्रवाशांना उतरवले

मिरारोडकडून चर्चगेटकडे जाणारी एक लोकल त्यावेळी येत होते. त्या गाडीचा मोटरमनला या घटनेची माहिती देण्यात आली. रेल्वे पटरी वाकडी झालेल्या ठिकाणापूर्वीच लोकल थांबवण्यात आली. लोकलमधील प्रवाशांना गाडीतून उतरवण्यात आले. त्यानंतर दहा किमीच्या स्पीडने रिकामी लोकल ट्रॅकवरुन सुरळीत गेली. यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बाजूच्या पटरीवर काम करणाऱ्या मजदूरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

का झाली पटरी वाकडी

ट्रकमधील दगड कमी झाल्याने ट्रक वाकडी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर युजर्सकडून अनेक कॉमेंट केल्या जात आहे. तसेच त्या रेल्वे मजुरांचे आभारही व्यक्त केले जात आहेत.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....