Mumbai Landslide : चेंबूर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, पाहा संपूर्ण यादी

मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहे.

Mumbai Landslide : चेंबूर दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, पाहा संपूर्ण यादी
Mumbai Landslide
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 4:57 PM

मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींच्या नावाची यादी समोर आली आहे. यातील जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

?मृत व्यक्तींच्या नावाची संपूर्ण यादी

            नाव            –        वय

  • मीना सुर्यकांत झिमूर – 45 (स्त्री)
  • पंडित राम गोरसे – 50 (पु)
  • शीला गौतम पारधे – 40 (स्त्री)
  • शुभम गौतम पारधे – 10 (पु)
  • श्रृती गौतम पारधे – 15 (स्त्री)
  • मुकेश जयप्रकाश अग्रहारी – 25 (पु)
  • जीजाबाई तिवारी – 54 (स्त्री)
  • पल्लवी दुपारगडे – 44 (स्त्री)
  • खुशी सुभाष ठाकूर – 2 (स्त्री)
  • सुर्यकांत रविंद्र झिमुर – 47 (पु)
  • उर्मिला ठाकूर – 32 (स्त्री)
  • छाया पंडित गोरसे – 47 (स्त्री)
  • अपेक्षा सुर्यकांत झिमुर – 20 (स्त्री)
  • प्राची पंडित गोरसे – 15 (स्त्री)
  • अनोळखी – 26 (पु)
  • अनोळखी – 26 (पु)

? जखमींच्या नावाची संपूर्ण यादी

  नाव              =        वय

  • संजय गायकवाड – 40 (पु)
  • विजय खरात – 40 (पु)
  • अक्षय सुर्यकांत झिमुर – 26 (पु)
  • लक्ष्मी आबाजी गंगावणे – 40 (स्त्री)
  • विशाखा गंगावणे – 15 (स्त्री)

नेमक काय घडलं? 

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळ चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे  एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे.  यात 18 जणांचा मृत्यू झाला.

केंद्राचीही 2 लाखांची मदत

मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राज्य शासनाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

(Mumbai Rain Chembur Wall Collapse dead and injured person list)

संबंधित बातम्या : 

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.