Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. दिल्लीहून मुंबईला येणारी दोन विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. मुंबईत गेल्या २ तासांपासून जोराचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे दिल्ली-मुंबई विमान हैदराबादकडे वळवलं
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 8:45 PM

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे, मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या १ तासापासून मुंबईत ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळेदिल्ली मुंबई विमान हे हैदराबादकडे वळवण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे विस्तारा कंपनीच विमान हैदराबादला रवाना करण्यात आलं. मुंबईत लँडिंग होऊ शकणार नसल्याने हे विमान हैदराबादला रवाना करण्यात आलंय. विस्तारा कंपनीची दोन विमान मुंबईऐवजी हैदराबादला रवाना केली गेली आहेत.

मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. उद्याही मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे चांगलीच कसरत झाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना पाण्यातून वाट काढावी लागलीये.

नवी मुबंईत गेल्या 1तासापासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सानपाडा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला आहे. काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

पुण्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. उद्या पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. पण मुसळधार पावसामुळे मैदानात चिखल झाला आहे. त्यामुळे उद्याच्या सभेवर पावसाचं सावट दिसत आहे.

मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत.
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.