Vikroli Landslide : मुंबईत मुसळधार! विक्रोळीत पंचशील नगर खंडोबा टेकडी इथं घरावर दरड कोसळली
मुंबईत मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे.
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने (Mumbai Rain Live) मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. मुंबईच्या विक्रोळीतील पंचशील नगर इथं दरड कोसळली. पंचशील नगर खंडोबा टेकडी इथं दरड कोसळली (Vikroli Landslide) आहे. यामध्ये घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र अद्यापतरी या घटनेत कोणत्याही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. तसंच कुणालाही जखम झाल्याची माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे या घरात कुटुंब वास्तव्यास होतं. मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain Orange Alert) कोसळलेली दरड या घरावर पडली आणि त्यात घराचं नुकसान झालं आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे विक्रोळीत दरड कोसळण्याची दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. आता याठिकाणी बचावकार्य केलं जात आहे. अद्यात या दरड कोसण्याच्या दुर्घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. शुक्रवार पर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मुंबई सकाळई 9 नंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह पश्चिम आणि मध्य उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. तसंच सखल भागात पाणी साचल्यानं मुंबईच्या वाहतुकीवरही परिणाम जाणवू लागलाय.
थोडक्यात पण महत्त्वाचं :
- बांद्रा टी जंक्शनवर पाणी भरलं
- घाटकोपर – लिंक रोडवरही भरलं पाणी
- बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर मुसळधार पावसामुळे परिसरास तलावाचे स्वरूप
- पावसामुळे मुंबईतील लोकलच्या तिन्ही मार्गावरील सेवेवर परिणाम, लोकलसेवा धीम्या गतीनं
- वसई-विरार, नालासोपाऱ्यात पावसाचा जोर कायम, विरारच्या विवा कॉलेज परिसरातील रस्ता जलमय