Mumbai Rain Live | मुंबईत पुन्हा जोराच्या पावसाला सुरुवात

| Updated on: Jul 17, 2021 | 12:02 AM

मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळतंय. दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेली 5 ते 6 तास पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे सखल भागांत पाणीच पाणी पाहायला मिळतंय.

Mumbai Rain Live | मुंबईत पुन्हा जोराच्या पावसाला सुरुवात
mumbai rain

मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळतंय. दादर, सायन, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेल्या अनेक तासांपासून हा पाऊस पडतोय… तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील धुवाधार पाऊस बरसतोय…. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे… दीड ते दोन फूटांपर्यंत अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं.. यामुळे दुचाकी आणि चार चाकींचे टायर देखील पाण्याखाली गेले होते तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची पावसाने मात्र चांगलीच तारांबळ उडवली…! (Mumbai Rain Live Update heavy Rain Mumbai And Suburbs)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jul 2021 03:31 PM (IST)

    मुंबईत पुन्हा जोराच्या पावसाला सुरुवात

    मुंबईत पुन्हा जोराच्या पावसाला सुरुवात, गेल्या दोन ते तीन तासांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.

  • 16 Jul 2021 11:15 AM (IST)

    Mumbai Rain : मुंबईत पावसाची पुन्हा विश्रांती

    मुंबईत पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. सकाळच्या टप्प्यात जोरदार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. त्यानंतर थोडीशी अल्पशी विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सुरु झाला. पण आज ऊन पावसाचा खेळ सकाळपासून सुरुच आहे. श्रावण महिन्यात जसा ऊन सावल्याचं पाठशिवणीचा खेळ जसा सुरु असतो, अगदी त्याच प्रकारे आज मुंबईत पाऊस-अल्पशी विश्रांती-पुन्हा पाऊस असं वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 16 Jul 2021 10:45 AM (IST)

    मुंबईच्या लोअर परेल भागात पुन्हा पावसाला सुरुवात

    अल्पशा विश्रांती नंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केलेली आहे. मुंबईच्या लोवर परेल, दादर, हिंदमाता परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे.

  • 16 Jul 2021 10:42 AM (IST)

    नालासोपारा पूर्व आचोले रोड गुडगाभर पाण्याखाली

    नालासोपारा:- नालासोपारा पूर्व आचोले रोड गुडगाभर पाण्याखाली..

    सकाळपासून जोर पकडलेल्या जोरदार पावसाने आचोले रोड सह शहरातील अनेक सकल भागातील रस्त्यावर साचले पाणी..

    गुडगाभर पाणी साचल्याने आचोले रोडवरून मार्ग काढन्यायासाठी वाहनधारकांना करावी लागत आहे कसरत

    पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग बंद झाल्याने थोड्याशा पावसात सुद्धा आचोले रोड जात आहे पाण्याखाली..

    आज सकाळी 10 वाजताची आचोले रोडवरील दृश्य

  • 16 Jul 2021 10:10 AM (IST)

    कुर्ला, सायन, चुनाभट्टी, विद्याविहार मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी

    चेंबुर येथे अनेक लोकल थांबलेल्या  आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, विद्याविहार मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी
    विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान अनेक लोकल  ट्रेन थांबल्या आहेत प्रवासी  ट्रेक वर चालून स्टेशन गाठण्याचा प्रयत्न करत आहेत
  • 16 Jul 2021 09:38 AM (IST)

    दमदार बॅटिंगनंतर पावसाची विश्रांती

    गेल्या पाच ते सहा तासांपासून पडणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. आता कुठे जरासं ऊन पडू लागलेलं आहे. बरोबर ऑफिसला निघण्याच्या वेळी पावसाने विश्रांती घेतल्याने चाकरमन्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.

  • 16 Jul 2021 08:34 AM (IST)

    पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली, मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं

    पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरून फास्टवर वळवण्यात आली कुर्ला – विद्याविहारची वाहतूक 20 ते 25 मिनिट उशिराने हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिट उशिराने रेल्वेचे मुख्य जनसंपर्क शिवाजी सुतार यांची माहिती

  • 16 Jul 2021 08:30 AM (IST)

    पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली, मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं

    पावसामुळे लोकलची वाहतूक कोलमडली

    मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं

    मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरुन फास्टवर वळवण्यात आली

    कुर्ला – विद्याविहारची वाहतूक 20 ते 25 मिनिट उशिराने

    हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिट उशिराने

    रेल्वेचे मुख्य जनसंपर्क शिवाजी सुतार यांची माहि

  • 16 Jul 2021 08:29 AM (IST)

    महाविकास आघाडी सरकारने SEBC च्या उमेदवारांना दिलासा देणारा शासन निर्णय संपुर्णपणे ‘फसवा’

    महाविकास आघाडी सरकारनं SEBC च्या उमेदवारांना दिलासा देणारा शासन निर्णय संपुर्णपणे ‘फसवा’

    आधीच अडचणी आणि निराशाजनक वातावरणात असणार्या विद्यार्थ्यांना खोटा दिलासा देऊन केली जातेय फसवणूक

    शासन आदेशात एक नाही तर अनेक गोष्टींचा घोळ

    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत केले गंभीर आरोप

    प्रस्थापितांना भरती प्रक्रियेत जाणीवपुर्वक गोंधळाच स्थिती निर्माण करायची आहे

    यामुळेच ही संपुर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा न्यायलयाच्या कचाट्यात सापडेल आणि महाविकास आघाडीच्या कृतीशुन्यतेला असह्यातेच नाव देत सरकारला पळवाट मिळेल

    अश्यानं हे सरकार अनेकांना स्वप्निल लोणकर सारख्या दुर्देवी मार्गावर लोटत असल्याचा गंभीर आरोप

    गोपीचंद पडळकरांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

  • 16 Jul 2021 08:27 AM (IST)

    सायन पूर्वला नदीचं स्वरुप, पाणी तुंबलं, दुकानांमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात

    मुंबईत काल रात्रीपासून थांबून थांबून पाऊस पडत आहे. त्यामुळेच मुंबई उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी जमण्यास सुरुवात झाली आहे. सायन पूर्व या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले की जणू या भागाला नदीचे स्वरूप आले आहे. आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा आता पाणी घुसण्यास सुरवात झाली आहे तर वाहनांचे टायर आता पाण्याखाली गेलेत.

  • 16 Jul 2021 08:27 AM (IST)

    सखल भागांमध्ये पाणीच पाणी, हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल जलमय

    रात्रभर मुंबईमध्ये पाऊस कोसळत आहे आणि आताही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे…  दादर, हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे… मुंबईच्या पावसाने हिंदमाता परिसर नियमित जलमय होतो… रात्रीपासून चाललेल्या पावसानं आताही हिंदमाता परिसर जलमय झालाय… परळच्या ब्रिज पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे… मुंबई महापालिकेकडून पाण्याचे पंप सुरू करण्यात आलेले आहे…त परंतु पावसाचा जोर वाढल्याने पाणीही वाढत आहे

  • 16 Jul 2021 08:23 AM (IST)

    मुंबईत रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग

Published On - Jul 16,2021 8:20 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.