Mumbai Rain Live Updates | अंधेरीत संरक्षण भिंत कोसळली, एक जखमी

| Updated on: Jun 12, 2021 | 12:04 AM

हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे.

Mumbai Rain Live Updates | अंधेरीत संरक्षण भिंत कोसळली, एक जखमी
Mumbai Rain

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 11 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Jun 2021 11:54 PM (IST)

    अंधेरीत संरक्षण भिंत कोसळली, एक जखमी

    मुंबईत आज दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी पूर्वेत गुंदवली परिसरात एका इमारतीच्या बाहेर असलेल्या कंपाउंडची भिंत कोसळून एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटना आज संध्याकाळी 7:30 च्या सुमारास घडली  आहे. जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले आहेत. घटनास्थळावर अंधेरी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचले आहेत

  • 11 Jun 2021 09:44 PM (IST)

    माळशेज घाटात बोगद्याजवळ कारवर दरड कोसळली, कारचा चक्काचूर

    मुरबाड : गेल्या 3 दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे आज सायंकाळच्या सुमारास माळशेज घाटात बोगद्याजवळ कारवर दरड कोसळली असून कारचा चक्काचूर झाला आहे. गाडी चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने जीवीतहानी टळली नाही

  • 11 Jun 2021 08:35 PM (IST)

    ठाण्यात पुन्हा पावसाला सुरुवात

    ठाणे : दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणेकर सुखावले आहेl. पावसाचा जोर हा कालसारखा जरी नसला तरी मात्र काही सखल भागात थोड्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठाणे शहरात दिवसभरात अधूनमधून पाऊस पडत होता. मात्र रात्रीच्या वेळी पावसाने जोर धरला. ठाणे शहरात काही ठिकाणी झाडे आणि फाद्या रस्त्यावर पडले. हवामान खात्याकडून 12 जून पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात गाड्या आणि नागरिक बाहेर पडताना दिसले.

  • 11 Jun 2021 07:26 PM (IST)

    मुंबईकरांची पुन्हा परीक्षा, 13 आणि 14 जूनला अतिवृष्टीचा इशारा, समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई

    मुंबईत 13 आणि 14 जूनला अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र किनाऱ्या लगतच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, अशी सूचना मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

  • 11 Jun 2021 07:05 PM (IST)

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली होती. अधूनमधून जोरदार पडलेल्या पावसाने शहरातील मुख्य रस्ते जलमय होऊन, फूट दोन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. वसई पूर्व अग्रवाल गोलानी या उधोगिक वसाहतीत तर या पावसामुळे कहरच झाला होता. मुख्य रस्त्यासह कंपनीमध्ये गुडघा ते कंबरेइतके पाणी साचले होते. याच परिसरात वसई विरार महापालिकेचे लसीकरण केंद्र असल्याने लसीकर घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत त्यांना घरी परतावे लागले आहे. सायंकाळी कंपनीतून घरी जाणाऱ्या चाकारामण्याची मोठे हाल झाले.

  • 11 Jun 2021 05:04 PM (IST)

    पुढचे तीन तास जास्त महत्त्वाचे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

    पुढील 3 तासात जोरदार पावसाचा इशारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, त्यामुळे या चारही जिल्ह्यांसाठी पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत.

  • 11 Jun 2021 03:28 PM (IST)

    मीरा रोड, भाईंदर, काशीमिरा आणि उत्तनमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

    मीरा भाईंदर : मीरा रोड, भाईंदर, काशीमिरा आणि उत्तनमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु. सकाळपासून हलकासा पाऊस सुरु होता. आता दुपारनंतर विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

  • 11 Jun 2021 03:17 PM (IST)

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात, सकल भागात पाणी साचायला सुरुवात

    वसई :

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात

    शहरातील सकल भागातील रस्ते गेले पाण्याखाली

    नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, वसईतील एव्हरशाईन, वसंत नागरी सर्कल, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम विवा कॉलेज रोडवर गुढगाभर साचले पाणी

    पावसाचा जोर कायम राहिला तर अतिवृष्टीची शक्यता

  • 11 Jun 2021 12:19 PM (IST)

    वसई-विरार, नालासोपाऱ्यात रिमझिम, शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरुवात

    वसई विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरु

    शहरातील सकल भागात पाणी साचायला सुरवात

    नाले तुडुंब भरल्याने चेंबर मधून पाणी रस्त्यावर यायला सुरवात

    विरार पूर्व विवा जहांगिड परिसरातील ऋषी विहार फेस 2 समोरील 12 वाजताची दृश्य

  • 11 Jun 2021 10:14 AM (IST)

    मुंबई, नवी मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरु, सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली

    मुंबई, नवी मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरु

    मुंबईच्या काही भागात पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे

    वरळी, दादर, विक्रोळी, सायन, हिंदमाता, अंधेरी या भागात पाऊस कोसळतो आहे

    सखल भागांमध्ये पाणीदेखील साचायला सुरुवात झाली आहे

    सायन किंग्स सर्कल या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेला आहे

    सध्याची ट्राफिक रस्त्यावरची सुरळीत सुरू आहे

    ट्रेनही तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू आहे

    हवामान विभागाने वर्तवला प्रमाणे 11 ते 14 मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे

    रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आहे

    त्यामुळे मुंबई जर पाऊस असाच पडत राहिला तर परवा सारखी मुंबईची तुंबई  होऊ शकते

  • 11 Jun 2021 09:58 AM (IST)

    पावसाचा एपीएमसी भाजी मार्केटला फटका, भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले

    नवी मुंबई –

    पावसाचा एपीएमसी भाजी मार्केटला फटका, भाजीचे दर 10 ते 15 टक्क्यांनी घसरले

    उपनगरातील ग्राहक बाजारात फिरकला नसल्यानं शेतमाल पडून

    एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मात्र मालाला उठाव नाही

    मुंबईसह उपनगरात जाणारा भाजी पाला मार्केट बाहेर गेलाच नाही

    आज भाजीपाल्याच्या 374 गाड्या आल्या

    10 ते 15 टक्के पालेभाज्या, फळभाज्या झाल्या खराब

  • 11 Jun 2021 09:12 AM (IST)

    मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परीसरात पुन्हा पावसाला सुरुवात

    – मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परीसरात पुन्हा पावसाला सुरुवात

    – जोरदार वारे वाहू लागले, आकाशात काळे ढग दाटून आले, स्काय लाईन अदृष्य

    – आज १२.४५ वा. समुद्रात हायटाईड

    – अंदाजे पाच मिटर पर्यंत लाटा उसळणार, किनारपट्टी भागात न जाण्याचं पालिकेचं आवाहन

  • 11 Jun 2021 09:07 AM (IST)

    चार दिवसानंतर औरंगाबाद शहरात पावसाने दिली उघडीप

    औरंगाबाद –

    चार दिवसानंतर औरंगाबाद शहरात पावसाने दिली उघडीप

    औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र पडलं ऊन

    चार दिवस औरंगाबाद शहरात सुरू होता मुसळधार पाऊस

    11 जूनपर्यंतही मराठवाड्यात मान्सून आला नसल्यामुळे वाढली चिंता

  • 11 Jun 2021 08:40 AM (IST)

    मुंबई शहरात पावसानं घेतली उसंती

    मुंबई शहरात पावसानं घेतली उसंती

    – मुंबईतील हाजीअली ते कोलाबा परिसरात पाऊस थांबला…

    – मरिन ड्राईव्हवर देखिल वाहतूक सामान्य…

    – ९ नंतर नागरीकांना मरिन ड्राई्व्हवर येण्यास मनाई

    – सुरक्षेचा ऊपाय म्हणून या परिसरात कुणी येऊ नये यासाठी पोलिसांकडून गस्त

  • 11 Jun 2021 07:40 AM (IST)

    पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे, संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

    पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे

    संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

    कोकण,मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

    मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट

    नाशिक,धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित

  • 11 Jun 2021 07:32 AM (IST)

    नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

    नवी मुंबई –

    नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

    पावसासह सर्वत्र पसरले धुके

    हवामान विभागाने अति पर्जन्यवृष्टी चा दिला होता इशारा

    रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाचा जोर वाढला

    नवी मुंबई पनवेल मधील काही शहरात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस

  • 11 Jun 2021 07:07 AM (IST)

    रत्नागिरी  जिल्ह्यात पावसाची पूर्णतः विश्रांती

    रत्नागिरी  जिल्ह्यात पावसाची पूर्णतः विश्रांती

    रात्रीपासून पावसाची एकही सर नाही

    आजपासून पुढील पाच दिवस कोकणासाठी हवामान खात्यानं जारी केला होता अलर्ट

    मुसळधार ते अति मुसळधार पावसाची वर्तविण्यात आली होती शक्यता

    सकाळपासून होतय सूर्यदर्शन

  • 11 Jun 2021 07:04 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

    नागपूर –

    भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी ११ जून ते १४ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व एक किंवा दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • 11 Jun 2021 06:51 AM (IST)

    मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

    मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

    लोअर परळ, दादर, वांद्रे, विले पार्ले, अंधेरीमध्ये पावसाची हजेरी

    मालाड सबवे आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात झालीये

    मानखुर्द. कुर्ला, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडमध्येही मुसळधार

Published On - Jun 11,2021 6:47 AM

Follow us
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.