Mumbai Rains: गोवंडीत घर कोसळून 3 ठार, 7 जखमी; ढिगारा उपसण्याचे काम सुरू

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोवंडीत दुमजली घर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. (Mumbai Rains: 3 dead,7 injured after house collapses in Govandi)

Mumbai Rains: गोवंडीत घर कोसळून 3 ठार, 7 जखमी; ढिगारा उपसण्याचे काम सुरू
building collapsed,Govandi,
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 10:58 AM

मुंबई: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोवंडीत दुमजली घर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून सातजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील या सातही जखमींवर घाटकोपरच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं. (Mumbai Rains: 3 dead,7 injured after house collapses in Govandi)

आज पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. गोवंडीच्या शिवाजीनगरमधील बॉम्बे सिटी हॉस्पिटलजवळ ही दुर्घटना घडली. पहाटे सर्वजण साखर झोपेत असताना हे दुमजली घर कोसळले. त्यामुळे परिसरात एकच हाहाकार उडाला. घर कोसळण्याचा आवाज आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या आक्रोशामुळे जागे झालेल्या शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्यास सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. मात्र, पाऊस आणि अंधारामुळे मदत कार्यात व्यत्यय येत होता. तसेच हे घर दाटीवाटीच्या भागात असल्यानेही मदतकार्यात अडथळा येत होता.

सायन, राजावाडीत उपचार सुरू

या दुर्घटनेत एकूण 10 जण गंभीर जखमी झाले. या सर्वांना तात्काळ राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गंभीर जखमी झालेल्यांचा मृत्यू झाला. इतर सात जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

दुर्घटनेतील मृतांची नावे

नेहा परवेज शेख, वय 35 मोकर झबीर शेख, वय 80 शमशाद शेख, वय 40

जखमींची नावे

परवेज शेख, वय 50 अमिनाबी शेख, वय 60 अमोल धडाई, वय 38 समोल सिंग, वय 25 मोहम्मद फैजल कुरेशी, वय 21 नामरा कुरेशी, वय 17 शाहीना कुरेशी, वय 26 (Mumbai Rains: 3 dead,7 injured after house collapses in Govandi)

संबंधित बातम्या:

Kolhapur Panchganga river : ड्रोनच्या माध्यमातून पाहा पंचगंगा नदीचं रौद्ररुप

Raigad Rain : रायगडमधील रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरु आहे?

Maharashtra Rain Live | कोल्हापुरात दुर्दैवाने एक 2019 सारखी परिस्थिती येतीय : सतेज पाटील

(Mumbai Rains: 3 dead,7 injured after house collapses in Govandi)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.