Mumbai Rains: मुंबई, पालघर,डहाणूसाठी पुढील 24 तास महत्वाचे, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढील 24 तासात मुंबई, पालघर आणि डहाणू येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर ढगांचा कडकडाट आणि वीज देखील कोसळण्याची शक्यता आहे.

Mumbai Rains: मुंबई, पालघर,डहाणूसाठी पुढील 24 तास महत्वाचे, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत मुसळधार पाऊस
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 10:43 AM

मुंबई: राज्याच्या राजधानी मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबईतील काही भागात 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. नालासोपारा, सायन रेल्वे रुळांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचं दिसून आलं. पुढील 24 तासात मुंबई, पालघर आणि डहाणू येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर ढगांचा कडकडाट आणि वीज देखील कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारे वाहतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

पुढील 4 तासात पावसाची काय परिस्थिती?

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढील 24 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर ढगांचा कडकडाट आणि वीज देखील कोसळण्याची शक्यता आहे. याशिवा जोरदार वारे वाहतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते , रेल्वे मार्ग, प्रभावित होऊ शकतात. लोकल सेवाही प्रभावित होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भरतीची वेळ असल्यानं पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. जुन्या इमारती अति पावसामुळे कोसळू शकतात, 45-55 ते 60 किमी प्रति ताशी वेगानं वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईत कुठे आणि किती पाऊस झाला ?

मुंबईत 17 जुलै सकाळपासून 18 जुलै मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत सांताक्रुझमध्ये 217.5 मिमी, कुलाबा 178.0 मिमी, महालक्ष्मी 154.5 मिमी, बांद्रा 202.0 मिमी, जुहू विमानतळ 197.5 मिमी, राम मंदिर 171.5 मिमी, मिरा रोड 204.0 मिमी, दहिसर 249.5.5 मिमी, भायंदरला 174.5 मिमी पाऊस झाला आहे.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

(Mumbai Rains IMD alert heavy to very heavy rainfall alert for Mumbai Palghar and Dahanu)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.