Mumbai Rains Live Updates | जळगावच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले

| Updated on: Jul 20, 2021 | 12:32 AM

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. मुंबईत तुफान पाऊस बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

Mumbai Rains Live Updates | जळगावच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. मुंबईत तुफान पाऊस बरसतोय. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jul 2021 11:56 PM (IST)

    ठाण्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, वंदना टॉकिज परिसरात पाणी साचले

    ठाण्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
    वंदना टॉकिज परिसरात साचले पाणी
    कंबरेपर्यंत साचलं पाणी
    ठाणे महापालिकेकडे लोकांची वारंवार तक्रार तरी महापालिकेच दुर्लक्ष
  • 19 Jul 2021 10:35 PM (IST)

    जळगावच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले

    जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. रात्री 10 वाजता हे दरवाजे उघडले. हतनुर धरण प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

    विदर्भाच्या काही भागात पाऊस होत असल्यामुळे पूर्णा नदीची पातळीत वाढ होत असल्यामुळे हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले असून 13914 क्‍यूसेस प्रमाणे पाण्याचा विसर्ग धरणातून सोडण्यात येत आहे

  • 19 Jul 2021 10:25 PM (IST)

    कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पाणी, पोलीसही हैराण

    कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात साचले पाणी

    या पाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत

    गेल्या 1 तासापासून पाणी साचल्याने पोलिसांना त्रास

  • 19 Jul 2021 10:24 PM (IST)

    कल्याण रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वीस मिनिटे वाहतूक बंद

    कल्याण रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वीस मिनिटे वाहतूक होती बंद

    कल्याण-कसारा कल्याण कर्जत दरम्यान वाहतूक होती बंद

    पावसाचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू

    कल्याण रेल्वे पोलिसांची माहिती

  • 19 Jul 2021 08:31 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी

    वसई :  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे

    वसई हद्दीत वासमारे ब्रीज, लोढा धाम परिसरात मुख्य रस्त्यावरील मुंबई लेनवर गुडघा ते कंबरेईतके पाणी साचले आहे.

    महामार्गाजवळच्या डोंगराचे पाणी रस्त्यावर आल्याने, आणि त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने हे पाणी साचले आहे.

    पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून, या सर्व वाहनधारकांना मदत करण्यासाठी वसईच्या वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस परिश्रम घेत आहेत.

    गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होत असून वसई च्या बाफाणे पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

    राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असतानाही आय आर बी ची यंत्रणा मात्र याकडे फिरकत ही नसल्याने वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे

  • 19 Jul 2021 08:28 PM (IST)

    नागपुरात काही भागात रिमझिम तर काही भागात साधारण पावसाला  सुरुवात

    नागपूर – नागपुरात काही भागात रिमझिम तर काही भागात साधारण पावसाला  सुरुवात

    दुपारपासून पावसाची उघडझाप सुरू

  • 19 Jul 2021 08:07 PM (IST)

    ठाणे कळवा दुर्घटना, मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, एकनाथ शिंदेंची घोषणा 

    ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची कळवा रुग्णालयाला भेट

    ठाणे कळवा पूर्व भागातील घोलाई नगर परिसरातील घरांवर दरड कोसळल्याच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत  त्यांनी जाहीर केली.

    सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील

    अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून डोंगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार

  • 19 Jul 2021 07:50 PM (IST)

    पेणच्या दुरशेत भागात तटरक्षक दलाची एक तुकडी दाखल 

    रायगड : पेणच्या दुरशेत भागात तटरक्षक दलाची एक तुकडी दाखल

    पेणमध्ये नदी, नाले, खाडीचे उधाण, मुळे पेण तालुक्यातील अनेक गावे जलमय

    अद्याप कोणतीही जिवीतहानी नाही

    जोहे, दुरशेत, खरोशी, बळवली, वरसई, जावळी, निफाड, करोटी, निधवली, वरसई, गागोदे, पाडले, रावे, साई, ताबंडशेत, जितेसह अनेक गावे पाण्याखाली.

    खारेपाट, पेण पुर्व, खारबंदीस्ती असलेल्या अनेक गावात पाणि शिरल्याने प्रशासनाने तटरक्षक दलाची घेतली मदत.

  • 19 Jul 2021 06:56 PM (IST)

    शहरात मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू

    भिवंडी : शहरात मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू

    कामतघर येथील वऱ्हाळ तलाव ओव्हरफ्लो

    नजीकच्या भारत कॉलिनी निवासी भागात शिरले पाणी, सर्वत्र चिंता

  • 19 Jul 2021 06:11 PM (IST)

    कल्याण-उल्हासनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद

    कल्याण-उल्हासनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद

    कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात रस्त्यावरचा पूल पाण्याखाली

    वालधुनी नदीवर हा पूल आहे

    आजूबाजूच्या परिसरात नदीचे पाणी शिरले

  • 19 Jul 2021 06:09 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे मीरा रोडमध्ये 9 वर्षाचा मुलगा वाहून गेला

    मुसळधार पावसामुळे मीरा रोडच्या मुन्शी कंपाउंड येथील 9 वर्षाच्या मुलगा नाल्यात वाहून गेला. प्लेजंट पार्क अग्रवाल कंपाउंड जवळ मीरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाचे जवान नाल्यात वाहून गेलेल्या मुलाला शोधण्याचं काम करत आहेत. अब्दुल रहमान असं मुलाचं नाव आहे

  • 19 Jul 2021 06:04 PM (IST)

    शहापूरमधील भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ

    शहापूरमध्ये पडत असलेल्या पावसाचा जोर वाढला असून शहापूरमधील भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सापगाव जवळील भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून काही वाहनचालक आपला जीव धोक्यात टाकून पुलावरून गाड्या घेऊन जात आहेत.

  • 19 Jul 2021 05:16 PM (IST)

    सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील मसुदा तलाव भरला

    सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील मसुदा तलाव पूर्णपणे भरून वाहत आहे. सकाळी तलावाबाहेर मासे बाहेर पडल्याने मासे पकडण्यास एकच झुबड उडाली होती. तर आता पाउस ओसरला असून याचाच आनंद लुटायला ठाणेकर आणि बच्चे कंपनी देखील बाहेर पडली आहे. इथे नागरिकांमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्स नसून करोनाचा विसर ठाणेकरांना पडलाय की काय? असे दिसत आहे

  • 19 Jul 2021 05:14 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे जळगावच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडले

    जळगाव –

    हतनूर धरणाचे 6 दरवाजे पूर्णपणे उघडले

    धरणातून 10 हजार 347 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

  • 19 Jul 2021 04:20 PM (IST)

    विरार पूर्वेच्या पांढरतारा नदीला पूर, पूल पाण्याखाली, रस्ताही खचला

    विरार : विरार पूर्वेचा भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. पांढरतारा नदीला पूर आल्याने उसगाव भाताने आणि त्यापलीकडे 10 ते 12 गावाला जाणारा रस्ताही खचला आहे. त्यामुळे भाताने, नवसई, आडणे, थळ्याचा पाडा अशा प्रमुख गावच्या राहिवाशांना आता 25 किलोमीटरचा वळसा घालून गाव गाठावे लागत आहे.

  • 19 Jul 2021 04:12 PM (IST)

    कळव्याच्या न्यू शिवाजी नगर परिसरात कंबरे एवढे पाणी, नागरीक हतबल

    ठाणे जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कळवा पुण्यातील न्यू शिवाजी नगर या परिसरात कमरे एवढं पाणी साचला आहे. या शिवाजी रोड शेजारील एक भला मोठा नाला आहे. नाला ओसंडून वाहू लागल्याने परिसरात कमरे इतके पाणी साचले आहे. या कमरे इतक्या पाण्यात काही तरुण मस्ती करताना पहायला मिळाले. तर लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदार त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • 19 Jul 2021 04:05 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे कळव्याच्या घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळली, चार घरांचे नुकसान

    ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले, यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटना स्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.

  • 19 Jul 2021 04:02 PM (IST)

    माथेरानमधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन, जाण्यायेण्याचा सपंर्क तुटला

    रायगड :

    माथेरानमधील घाटात दरड कोसळून भुसख्खलन

    नेरळ ते माथेरानला जाणाऱ्या घाटातील एकमेव मार्गावर मोठ-मोठाली दरड कोसळून रस्ता बदं.

    माथेरानकडे जाण्यायेण्याचा सपंर्क तुटला

    बाधंकाम विभागावर लोकांचा रोष

    स्थानिकांची टिम मदतीला उपस्थीत, परंतु मोठ्या प्रमाणात दरड पडल्याने सगळे हतबल

  • 19 Jul 2021 03:27 PM (IST)

    Mumbra shilphata : मुंब्रा शीळ फाटा ते पनवेल-हायवे वाहतुकीसाठी बंद

    मुंब्रा, शिळफाटा आणि पारसिक डोंगररांग मुसळधार पावसामुळे मुंब्रा पनवेल हायवेवर पाण्याचा प्रवाह आलाय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तरी मुंब्रा शिळफाटा परिसरातील तसंच या मार्गाने जाणाऱ्यांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असं ठाणे पोलिसांनी आवाहन केलंय

  • 19 Jul 2021 02:01 PM (IST)

    Kalyan-Dombivali Rain Update : कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी, केडीएमसी आयुक्तांची माहिती

    कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले. नागरीकांची सोय केली जात आहे. रात्री नऊ वाजता 2.5 मीटरची भरती आहे. त्याचा परिणाम होणार आहे. त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

  • 19 Jul 2021 02:00 PM (IST)

    Ulhas river overflow : उल्हास नदीला पूर, चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली, बदलापूर शहरात पूरस्थितीची भीती

    बदलापूर शहर आणि परिसरात गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा प्रवाह आला आहे. त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीकिनाऱ्यावर असलेली चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उल्हास नदी ही पुणे आणि रायगड जिल्ह्यातून वाहत येऊन ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. कर्जतहून बदलापूर आणि पुढे कल्याणकडे ही नदी वाहत जाते. कालपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बदलापूरची उल्हास नदी चौपाटी सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही नसून उल्हास नदीला जर पूर आला, तर बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.

  • 19 Jul 2021 01:52 PM (IST)

    Badlapur Rain Update : बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला, बदलापूरची चौपाटी पाण्याखाली

    बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला, बदलापूरची चौपाटी पाण्याखाली

  • 19 Jul 2021 01:51 PM (IST)

    washim rain update : वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवसांच्या विश्राती नंतर जोरदार पाऊस

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवसांच्या विश्राती नंतर जोरदार पाऊस सुरू

  • 19 Jul 2021 01:42 PM (IST)

    पेण तालुक्यातील जोहे , कळवे, तांबडशेत, हमरापूर, विभागातील गणपती कारखान्यांतील नुकसान

    पेण

    पेण तालुक्यातील जोहे , कळवे, तांबडशेत, हमरापूर, विभागातील गणपती कारखान्यांतील नुकसान.

    पेण तालुक्यातील खाडी पट्याला लागुन असलेल्या सखल भागात पाणि भरले असुन अनेक गावात पाणि शिरले.

  • 19 Jul 2021 12:56 PM (IST)

    Ashish Shelar On Water Logged | मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्यावर पालिकेला चिंतन करण्याची गरज: आशिष शेलार

  • 19 Jul 2021 12:53 PM (IST)

    Raigad Rain Update : माणगाव मधुन जाणाऱ्या काळ नदीला पूर

    रायगड, माणगाव –

    माणगाव मधुन जाणाऱ्या काळ नदीला पूर

    माणगाव शहरातुन प्रातं कार्यालय, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, भुमी अभिलेख व ईतर शासकिय कार्यालयाला जाणाऱ्या कचेरी रोडवर पाणीच पाणी

    काळ नदीच्या आजुबाजुला राहणाऱ्या ग्रामस्थांना सावधानतेचा ईशारा

  • 19 Jul 2021 12:52 PM (IST)

    Raigad Rain Update : पेण तालुक्यातील जिते गावाजवळ बाळगगां नदीला पूर

    रायगड

    मुबंई गोवा महामार्गावर पाणी

    पेण तालुक्यातील जिते गावाजवळ बाळगगां नदीला पूर आला आहे.

    अनेक ठिकाणी छोट्या छोट्या पुलावरुन पाणि जात आहे.

    मुबंई गोवा महामार्गावरुन पाणि जात असल्यामुळे पाण्यातुन वाहने मार्गस्थ होत आहे.

  • 19 Jul 2021 12:50 PM (IST)

    Pen Rain Update : पेणमधील सर्व गणपती कारखान्यांमध्ये पाणी घुसले, सर्व मूर्त्या भिजल्या, लाखोंचं नुकसान

    पेण

    पेण मधील सर्व गणपती कारखान्यांमध्ये घुसले पाणी

    कारखान्यांमध्ये पाणी घुसल्याने सर्व मूर्ती भिजल्या

    मुसळधार पावसाने मूर्तिकार कारखानदारांचे केले नुकसान

    मुर्त्या भिजलाने लाखोंचं नुकसान

  • 19 Jul 2021 12:35 PM (IST)

    Maharashtra Rain Update : कोकण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अ‌लर्ट

  • 19 Jul 2021 12:34 PM (IST)

    Mumbai Traffic and Train Update : मुंबईत अजब वाहतूक कोंडी, कोकण रेल्वेही ठप्प

  • 19 Jul 2021 12:29 PM (IST)

    Raigad Rain Update : वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली

    रायगड –

    वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली

    दरड हटवन्याचे काम सुरू आहे

    पर्यायी मार्गाने ( नानवली मार्गे) वाहतूक सुरू आहे

    माणगाव- म्हसळा मार्गावर मोरबा च्या पुढे माणगाव तालुका हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली स्थानिक लोकांनी दिघी माणगाव रोड बनवत असताना प्रांताधिकारी शेडगे साहेबांकडे तक्रार केली होती

    मोठ्या प्रमाणात डोंगर खोदलेले आहेत आणि तिथल्या जुन्या मोऱ्यासुद्धा बंद करण्यात आले म्हणून पाणी जाण्यासाठी मार्ग नाही पाण्याने आपल्यासोबत डोंगराला रस्त्यावर आणले आहे

    सध्या शासनातर्फे दरड हटविण्याचे काम सुरु आहे

    पर्यायी मार्गाने (मांजरवणे) वाहतूक सुरू आहे

  • 19 Jul 2021 12:24 PM (IST)

    Konkan Rain : रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळली

    रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम; दरड हटवण्याचे काम सुरु, वाहतूक सुरु होण्याकरिता वेळ लागणार, कोकणात पावसाचा जोर कायम, कोकण रेल्वेची वाहतूकही रखडली

  • 19 Jul 2021 12:24 PM (IST)

    Ambernath-Badlapur Rain Update : अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रस्त्यावर साचलं पाणी

    अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रस्त्यावर साचलं पाणी

    एम्पायर इस्टेटच्या बाहेरील रस्त्यावर साचलं पाणी

    वाहनचालक पाण्यातून काढतायत वाट

    पावसाचा जोर अजूनही कायम असल्यानं पाणी वाढण्याची भीती

  • 19 Jul 2021 12:18 PM (IST)

    Mumbai local train update : बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर पाणी, आता कल्याणपर्यंतच रेल्वे सेवा सुरू

    बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावर साचलं पाणी. सध्या फक्त कल्याणपर्यंतच रेल्वे सेवा सुरू आहे. मात्र पाणी साचल्यामुळे आता संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प होण्याची भीती, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. दक्षिण मुंबईत पावसाचा जेव्हढा जोर आहे, तेव्हढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक पाऊस उपनगरातही पाहायला मिळत आहे.

  • 19 Jul 2021 12:13 PM (IST)

    Mumbai Rain Update : मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग खुला झालाय

    – मुंबई-नाशिक मार्गावरील कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना पहाटे घडली होती

    – रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पाच तासांच्या परिश्रमानंतर ही वाहतूक पुर्वपदावर आलीये

    – मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग खुला झालाय

    – अद्यापही दरड कोसळण्याचा धोका टळला नाहीये

    – जीव मुठीत घेत कारचालक प्रवास करत आहेत, घटनास्थळाहून आढावा घेतलाय आमचे

  • 19 Jul 2021 12:10 PM (IST)

    Thane Rain Update : ठाण्यात जोरदार पावसाच्या पाण्यात 15 बकऱ्या बुडाल्या

    ठाणे –

    जोरदार पावसामुळे बकऱ्यांना बसला फटका

    मुंब्रा येथील दोस्ती आणि नाईस पार्कजवळ बकरी ईदसाठी आणलेले 15 बकऱ्या बुडाले,

    14 बकऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे

    व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका

  • 19 Jul 2021 12:07 PM (IST)

    Dombivali Rain Update : डोंबिवली येथील गांधी नगर परिसरात असलेल्या मोठ्या नाल्याचं पाणी हिरवंगार झालं होतं

    डोंबिवली येथील गांधी नगर परिसरात असलेल्या मोठ्या नाल्याचं पाणी हिरवंगार झालं होतं

    पावसाचा फायदा घेत या नाल्यात केमिकल सोडण्यात आले होते

    केमिकल सोडल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती आहे

    आता पाऊस जोरदार होत असल्यामुळे हे केमिकल वाहून गेले असून नाल्याचे पाणी पुन्हा आपल्या स्वरूपात आले आहे

  • 19 Jul 2021 12:06 PM (IST)

    Vasai-Virar Rain Update : वसई-विरार नालासोपाऱ्यात 12 नंतर जोरदार पावसाला सुरवात

    वसई-विरार

    वसई-विरार नालासोपाऱ्यात 12 नंतर जोरदार पावसाला सुरवात

    वाऱ्या सह सुरु झाला पाऊस

    असाच पाऊस सुरु राहिला तर पुन्हा एकदा सकल भागात पाणी साचण्याची शक्यता

  • 19 Jul 2021 12:03 PM (IST)

    Bhiwandi Rain Update : भिवंडी शहर आणि तालुक्यात रववार सायंकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली

    भिवंडी शहर आणि तालुक्यात रविवार सायंकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली

    शिवाजी चौक, बाजारपेठ, ब्राह्मण आळी अंबिका नगर, ईदगाह या भागात घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

  • 19 Jul 2021 11:34 AM (IST)

    Mumbai-Goa Transport : मुसळधार पावसाचा मुबंई-गोवा वाहतुकीवर परिणाम, वाहतूक विस्कळीत

    रायगड –

    मुसळधार पावसाचा मुबंई-गोवा वाहतुकीवर परिणाम, वाहतूक विस्कळीत

    पेणजवळ चुनाभट्टी इथं महामार्गावर पाणी, कोकणात जाणाऱ्या लेनवर पाणी

    मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून वाहतूक सुरू

  • 19 Jul 2021 11:21 AM (IST)

    Bhandup Rain Update : मुंबईच्या भांडुप व्हिलेज रोड पाणी साचलेलं आहे

    मुंबई –
    भांडूप येथे आज संततधार पाऊस पडत आहे त्याचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे
    मुंबईच्या भांडुप व्हिलेज रोड पाणी साचलेलं आहे
    गुडघाभर पाणी मध्ये लोकांना वाट काढावी लागते
  • 19 Jul 2021 11:13 AM (IST)

    Ambernath Rain Update : अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने घेतलं रौद्ररूप, शिवमंदिर परिसरात नदीला आला मोठा प्रवाह

    अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठा प्रवाह आला आहे

    अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेर तर या नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय

  • 19 Jul 2021 11:12 AM (IST)

    Mulund Rain Update : मुलूंड सोनापूर इथे रस्ता पाण्याखाली

    – मुलूंड सोनापूर इथे रस्ता पाण्याखाली

    – घुडगाभर पाणी साचल्याने वाहतूकीसाठी रस्ता बंद

  • 19 Jul 2021 10:55 AM (IST)

    Goa-Konkan Railway : गोवा-कोकण रेल्वे मार्गावर थिविम ते करमळी रेल्वे स्थानका दरम्यान दरड कोसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

    गोवा-कोकण रेल्वे मार्गावर थिविम ते करमळी रेल्वे स्थानका दरम्यान दरड कोसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

    कोकण रेल्वे स्थानकावर अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा

    पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

  • 19 Jul 2021 10:54 AM (IST)

    Kalyan Rain Update : कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

    कालपासून कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरु आहे

    सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे

    रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे

    आजूबाजूच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते

    या पाण्यामुळे हा रस्ता खचल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी राजेश सावंत यांनी दिली आहे

  • 19 Jul 2021 10:45 AM (IST)

    कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली

    कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली

    अनेक गाड्या खोळंबल्या

    पहाटे 4 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प

  • 19 Jul 2021 10:45 AM (IST)

    पेण तालुक्यात महापूर, खाडीलगत गावाकडे जाणारे मार्ग बदं

    रायगड

    पेण तालुक्यात महापूर, खाडीलगत गावाकडे जाणारे मार्ग बदं

    तांबडशेत येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती

    जोहे, कळवे, दादर या इतर गावांकडे जाण्याचा मार्ग बंद

  • 19 Jul 2021 10:44 AM (IST)

    रायगड जिल्हा प्रशासनाचा नागरीकांना अलर्ट जारी

    रायगड –

    जिल्हा प्रशासनाचा नागरीकांना अलर्ट जारी

    भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात आज दिनांक 19जुलै 2021 रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे

    सखल भागातील नागरिकांनी विशेषतः नदी/खाडी/ समुद्र किनाऱ्यावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे

    दरड प्रवण गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. पावसाचे प्रमाण विचारात घेऊन अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच प्रवास करावा

    आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

  • 19 Jul 2021 10:43 AM (IST)

    भिवंडीच्या रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाची संततधार आजही कायम

    भिवंडीच्या रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाची संततधार आजही कायम

    सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच

    रात्रभर झालेल्या पावसामुळे शहरातील असंख्य सखल भागात पाणी

    शिवाजी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचले पावसाचे पाणी

  • 19 Jul 2021 10:42 AM (IST)

    मुसळधार पावसामुळे तुर्भे पोलीस ठाण्याचा सर्व परिसर पाण्याखाली

    नवी मुंबई –

    नवी मुंबई तुर्भे पोलीस ठाणे पाण्याखाली

    मुसळधार पावसामुळे तुर्भे पोलीस ठाण्याचा सर्व परिसर पाण्याखाली गेला आहे

    पाणी सर्व खोल्यांमध्ये शिरल्याने महिला पोलीस कर्मचा-यांचीही चांगलीच दमछाक झाली

    आरोपीना नेरुळ पोलीस ठाण्यात शिफ्ट करण्यात आली आहे

    पाणी सर्व खोल्यांमध्ये शिरल्याने महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवले आहे

    पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने पोलीसांना त्यातूनच वाट काढत काम करावे लागत आहे

  • 19 Jul 2021 10:41 AM (IST)

    खारघर व्हॅली गोल्फ कोर्सला पावसाचा फटका, कोरोडो रुपये खर्च करून बनवलेला गोल्फ कोर्स पाण्याखाली

    कोरोडो रुपये खर्च करून बनवलेल्या गोल्फ कोर्स पाण्याखाली
    गोल्फ कोर्स ला आले तलावाचे स्वरूप
    खारघर व्हॅली गोल्फ कोर्सला पावसाचा फटका
    गोल्फ कोर्स मध्ये सर्वत्र पाणीच पाणी
    पांडवकडा आणि डोंगरातून येणारे पाणी थेट गोल्फ कोर्स मध्ये
    पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच
    नवी मुंबई , पनवेल परिसरात मुसळधार पावसाने सखोल भागात साठले पाणी
  • 19 Jul 2021 10:22 AM (IST)

    ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ रस्त्यावर पाणी साचले

    ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ रस्त्यावर पाणी साचले आहे

    मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना वाट काढणे कठीण जात आहे…

    गेल्या तासाभरात 42 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे..

  • 19 Jul 2021 10:22 AM (IST)

    अती मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे मार्गावरही अडथळा

    अती मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे मार्गावरही अडथळा

    दगड ट्रॅकवर पडल्याने उत्तर पुर्व घाटात एक लाईन बंद, ट्रॅफिक स्लो,

    – सेंट्रल मुंबई डीआरएमची माहीती

    – सेवा पुर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू

  • 19 Jul 2021 10:21 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

    कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

    गेल्या अर्ध्या तासापासून पाऊस सुरू आहे

    पाऊस असाच राहिला तर काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे

  • 19 Jul 2021 10:20 AM (IST)

    बाणगंगा नदीला पूर, पूल पाण्याखाली

    रायगड

    बाणगंगा नदीला पूर, पूल पाण्याखाली

    डोणवत धरणाच्या पाण्यातून निघणाऱ्या बाणगंग नदीने ईशारा पातळी ओलांडली आहे.

    पेण तालुक्यातील मायनी गावाकडे जाणाऱ्या पुलावरुन पाणी जात असल्याने दोन्ही बाजुला नागरीक पाणी कमी होण्याची वाट पाहत बसले आहेत.

  • 19 Jul 2021 10:19 AM (IST)

    मुंबई उपनगरातील बोरवली, कांदवली तसेच मलाड भागात मुसळधार पाऊस

    मुंबई उपनगरातील बोरवली, कांदवली तसेच मलाड भागांमध्ये थांबून थांबून होतोय मुसळधार पाऊस

  • 19 Jul 2021 10:18 AM (IST)

    काल अतिवृष्टी मध्ये उघड्या गटाराच्या चेंबर मध्ये पडून वाहून गेलेला 4 वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता

    नालासोपारा –

    काल अतिवृष्टी मध्ये उघड्या गटाराच्या चेंबर मध्ये पडून वाहून गेलेला 4 वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे.. अनमोल सिंग असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे

    वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक रहिवासी यांच्या कडून शोध सुरू आहे मात्र मुलगा मिळून आला नाही..

    नालासोपारा पूर्व बिलालपाडयांच्या हानुमान नगर चाळी मध्ये रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती..

    घटनेला 24 तासाचा कालावधी उलटून ही मुलगा मिळाला नसल्याने त्याचे कुटुंबीय मात्र हवालदिल झाले आहे.

  • 19 Jul 2021 09:34 AM (IST)

    खारघर धबधब्यावर अडकलेल्या 115 पर्यटकांना अग्निशमन जवानांनी सुखरुप बाहेर काढले

    नवीमुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात खारघर च्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान रविवारी खारघर सेक्टर 5 येथील धबधब्यावर पर्यटकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दूतर्फी भरून वाहू लागल्याने पर्यटक धबधब्यावर अडकले अखेर सायंकाळी सातच्या सुमारास खारघर अग्निशमन जवानांनी जवळपास 115 पर्यटकांना ओढ्यावर सीडी लावून सुखरुप बाहेर काढले

  • 19 Jul 2021 09:32 AM (IST)

    नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे

    नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे

    अनेक ठिकाणी पाणी साचले आहे

    ऐरोलीमध्ये पाणी साचल्याने चालकांना आपली गाडी पाण्यातून काढावी लागत आहे

    जोरदार पाऊस पडत असल्याने वेगळ्या मार्गाचा वापर करावा लागत आहे

  • 19 Jul 2021 08:52 AM (IST)

    हवामान खात्याचा रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

    रत्नागिरी –

    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    हवामान खात्याचे रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

    जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात

    पहाटेपासून मुसळधार पाऊस

  • 19 Jul 2021 08:23 AM (IST)

    उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे

    उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे

    काही वेळापूर्वी मोठी सर येऊन गेली, मात्र सध्या फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे

  • 19 Jul 2021 08:15 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    रत्नागिरी –

    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    हवामान खात्याचे रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट

    जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात

    पहाटेपासून मुसळधार पाऊस

  • 19 Jul 2021 08:09 AM (IST)

    वसई-विरार शहरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु

    वसई-विरार शहरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु

    रिमझिम पडणाऱ्या पावसाने सध्यातरी सकल भागात कुठेही पाणी साचलेलं नाही

    काल दिवसभर साचलेले पाणी आता पूर्णपणे ओसरले आहे

    विरार ते चर्चगेट धावणाऱ्या दोन्ही दिशेच्या लोकल सकाळच्या वेळेत सुरळीत सुरु

    नालासोपारा रेल्वे ट्रैकवरही पाणी साचलेलं नाही

  • 19 Jul 2021 07:52 AM (IST)

    राज्यात अनेक भागात पुरेशा पावसाअभावी खरीप पेरणीवर मोठा परिणाम

    – राज्यात अनेक भागात पुरेशा पावसाअभावी खरीप पेरणीवर मोठा परिणाम

    – राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ११ टक्के क्षेत्रात खरीप पेरणी कमी

    – गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात अवघ्या ७० टक्के खरीप क्षेत्रावर पेरणी

    – गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ टक्के कापूस लागवड कमी

    – राज्यात तुर, उडीद, मूग या कडधान्याचा पेरा १८ टक्के घटला

    – लागवड क्षेत्र घटल्याने कडधान्य आणि कापूस उत्पादनावर होणार परिणाम

  • 19 Jul 2021 07:48 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

    पुणे

    पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

    पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज

    पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

  • 19 Jul 2021 07:47 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर पाऊस

    सिंधुदुर्ग –

    रात्रभर जिल्ह्यात पाऊस

    मात्र पहाटे पासून पावसाची थोडी विश्रांती

    काल दुपार नंतर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले

    नदी नाले रात्री भरून गेले होते

    मुसळधार पावसाचा कणकवलीला चांगलाच फटका

    सायंकाळी काही दुकानात शिरले होते पाणी

    तर नांदगावमध्येही काही घरात शिरले होते पाणी

  • 19 Jul 2021 07:45 AM (IST)

    मुंबईकडे येणारी पंचवटी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस रद्द

    नाशिक –

    मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्स्प्रेस रद्द

    नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस देखील रद्द

    मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    9 रेल्वे दोन दिवसांसाठी रद्द

  • 19 Jul 2021 07:43 AM (IST)

    रायगड जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपुन काढले

    रायगड

    रायगड जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपुन काढले

    अलिबाग ते रामराज मार्गे रोहा रस्ता खचला.

    सहाण येथे हा मार्ग खचला असुन या रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी बदं केला आहे.

    तर खोपोली-खालापुर परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने खोपोलीतील लौजी या रहिवाशी भागात पाणि साचले.

  • 19 Jul 2021 07:42 AM (IST)

    चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पडतोय पाऊस

    रत्नागिरी –

    चिपळूण, गुहागर, खेड परिसरात रात्रभर पडतोय पाऊस

    पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

    चिपळूण मधील शिवनदी व वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीत वाढ

    पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता

    नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनचे आव्हान

  • 19 Jul 2021 07:41 AM (IST)

    पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

    रायगड

    पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ.

    नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली.

    इशारा पातळी 20.25 मीटर सद्याची पाणी पातळी 20.30 मीटर.

    मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळून 3-4 घरांचे नुकसान झाले आहे.

    एकूण 5 कुटूंबातील 24 व्यक्तीना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

    जीवित हानी नाही.

  • 19 Jul 2021 07:39 AM (IST)

    मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी नेटवर्कचा मोठा अडथळा

    – मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी नेटवर्कचा मोठा अडथळा

    – अनेक नामांकित कंपन्यांचे काॅल ड्राॅप व्हायला सुरवात

    – अतिमुसळधार पावसामुळे नेटवर्कचा घोळ

Published On - Jul 19,2021 7:37 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.