AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांना आता जाग का आली?, सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय? ; राज ठाकरे यांचा ठाकरे गटावर घणाघात

Raj Thackeray on Uddhav Thackeray Group and Dharavi Redevelopment Project : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा... धारावीसाठी काढलेल्या मोर्चावरून टीकास्त्र. तसंच मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार?; राज ठाकरे म्हणाले, मेरी मर्जी...

यांना आता जाग का आली?, सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय? ; राज ठाकरे यांचा ठाकरे गटावर घणाघात
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 12:42 PM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : मनसेची आज आढावा बैठक होत आहे. या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी निशाणा साधला. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अदानी ग्रुपकडे देण्याला ठाकरे गटाने विरोध केला आहे. त्यासाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. यांना आता जाग का आली? सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

एक मोठा प्रकल्प मुंबईत येतो आहे. हा प्रकल्प अदानींना का दिला? अदानींकडे असं काय आहे? की विमानतळपण तेच हाताळू शकतात.कोळसा प्रकल्पही तेच हाताळू शकतात असं यांच्याकडे काय आहे? टाटांपासून इतरही लोक उद्योगात आहेत. त्यांच्याकडून डिझाईन मागवू शकत होते. टेंडर मागवू शकत होते. पण ते झालं नाही. अदानी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशीही बोलणं झालं होतं. मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडचं डिझाईन दाखवा. महाविकास आघाडीच्या लोकांना आज का जाग आली? हे सगळं जाहीर होऊन आठ- दहा महिने झाले असतील. मग यांनी आज का मोर्चा काढला?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मेरी मर्जी, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

ठाकरे गटाचा मोर्चा

धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो प्रकल्प अदानी ग्रुपला देण्याला ठाकरे गटाने आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटाकडून मोर्चाही काढण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेची आढावा बैठक

मनसेची लोकसभेची तयारी सुरू आहे. आज राज ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. मुंबईतील MIG क्लबमध्ये आज मनसेची लोकसभा आढावा बैठक पार पडली. राज ठाकरे 22 लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला. मुंबई, नाशिक, पालघर, रायगड, पुणे, विदर्भ मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघांचा राज ठाकरेंनी आढावा घेतला.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.