मुंबई गारठली ! दशकातल्या निच्चांकी तापमानाची नोंद, बलूचिस्तानमधून आलेल्या वादळानं मुंबई पुण्यावर धुळीची चादर
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तानातून आलेल्या वाऱ्यामुळं पांढरी धूळ मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळाली आहे.
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आहे. तर,मुंबईत (Mumbai) रविवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. हवामानातील बदल मुंबईकरांना अनुभवयाला मिळाला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पांढऱ्या रंगाची (White Powder layer) चादर पसरलेली पाहायला मिळाली. बलूचिस्तानमधून आलेल्या वादळानं मुंबई आणि पुण्यावर धुळीची चादर पाहायला मिळाली. थंडीची लाट (Cold Wave) आणि पावसाच्या हलक्या सरीमुळं मुंबईतील कमाल तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत रविवारी दृश्यमानता देखील कमी झाली होती. हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार रविवारी सांताक्रुझ येथील वेधशाळेत 23.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान आहे.
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तानातून आलेल्या वाऱ्यामुळं पांढरी धूळ मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळाली आहे. बलुचिस्तानहून आलेल्या वाऱ्यामुळं सौराष्ट्र, मुंबई आणि कोकणात या ठिकाणी पांढरी पावडर पाहायला मिळाली.
Mumbai weather really terrific today … Dusty Cloudy Windy Rainy Coolest … pic.twitter.com/TmJXFH4l5e
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
मुंबईत कमी कमाल तापमानाची नोंद
मुंबईत रविवारी चोवीस तासात गेल्या दहा वर्षातील कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथील वेधशाळेत याची नोंद झाली आहे. कुलाबा येथं 24 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं तर सांताक्रुझ येथे 23.8 अंश तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे 5.8 अंश आणि 6.9 अंश कमी नोंदवलं गेलं आहे. गेल्यावर्षीचं कमी कमाल तापमान 28.8 अंश तापमानाची नोंद झाली होती.
23/01:किमान तापमान उद्या पहाटे राज्यात खाली जाण्याची दाट शक्यता.मध्य महाराष्ट्रात खास करून उत्तर भागात (पुणे,नाशिक व आसपास)प्रभाव जाणवणार,असं पूर्वानुमान IMD ने दिले आहे. काही ठिकाणी एक अंकी नोंद शक्यता. मुंबई/आसपास किमान तापमान 14°C च्या आसपासची शक्यता. काही दिवस ट्रेंड राहील.TC pic.twitter.com/c0dZMthwM0
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
रविवारी रात्रीच्या वेळी कुलाबा येथे 21.6 अंश आणि सांताक्रुझ येथे 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर, पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळानं राज्यात मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे.
पावडर नेमकी कशाची
मुंबईतीलदुचाकी, चारचाकी आणि घरांवर पांढऱ्या पावडरचं साम्राज्य दिसून आलं. त्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय. ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय.
इतर बातम्या:
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : नाशिक जिल्ह्यात 2 हजार 526 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Mumbai Records lowest maximum temperature in last ten years due to Baluchistan Dust storm