काल शिंदेंच्या बाजूने निकाल; आज संजय राऊत यांची सनसनाटी पत्रकार परिषद लाईव्ह
Sanjay Raut on Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar Judgement About Shivsena : शिवसेना आमदार अपात्रतेचा काल निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल हा निकाल वाचून दाखवला. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला. त्यानंतर आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली.
मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी काल निकाल आला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपचे सध्याचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाने ‘न्याय’ देण्यासाठी सांगितलं होतं. त्या नार्वेकरांनी नक्की काय निकाल दिला? जे महाराष्ट्राला अपेक्षित होतं की, हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील, तसाच तो निकाल होता. त्यामुळे आम्हाल धक्का बसला नाही. किंवा आश्चर्यही वाटलं नाही. लोकांनाही वाटलं नाही. पण या निकालाने लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
ही तर ‘मॅच फिक्सिंग’!- राऊत
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्याआधी काल सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या निकालाच्या शक्यतेवर भाष्य केलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जो निकाल देतील तो ‘मॅच फिक्सिंग’ असेल, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर संध्याकाळी निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. तेव्हा काल संध्याकाळी माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. त्यानंतर आज त्यांची पत्रकार परिषद होत आहे.
काल नार्वेकर यांनी मॅच फ़िक्सिन्ग करून निकाल दिला आहे. या निकालाने लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं आहे. शिंदे यांच्या फुटलेल्या गटाची वकिली काल नार्वेकर करत होते. चोर लफेंगे, पाकिटमाराची त्यांना काल वकिली करावी लागली. त्याप्रमाणे त्यांनी ती केली, असं संजय राऊत म्हणाले.
भरत गोगावले प्रतोद म्हणून निवड चुकीची आहे. शिंदे गटनेते पद अवैध आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला खोटं ठरवयाचं काम राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. आमची बाजू न्यायाची आणि सत्याची आहे. अशी खूप संकटं शिवसेनेने पाहिलेली आहेत. अशा संकटांना शिवसेना घाबरत नाही. या संकटातून शिवसेना तावून सुलाखून निघाली आहे. आताही निघेल, असं राऊत म्हणालेत.