सर्वात मोठी बातमी : अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार?

कालच अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलं. शिरूरला तगडा उमेदवार देणार असल्याचं अजितदादा म्हणाले. त्यानंतर आता शिवसेनेचा बडा नेता अजित पवार गटाच्या मार्गावर?; अमोल कोल्हेंना मोठं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. हा नेता नेमका कोण आहे? वाचा...

सर्वात मोठी बातमी : अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार?
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 1:08 PM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी मुंबई | 26 डिसेंबर 2023 : शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलंय. त्यानंतर हा मतदारसंघ आणि आगामी लोकसभा निवडणूक याची राज्यात जोरदार चर्चा होतेय. अशातच अजित पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेंना धोबीपछाड देण्यासाठी ठाकरेंचा जुना शिलेदार अजित पवार मैदानात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांचं चॅलेंज काय?

अजित पवार यांनी काल बोलताना अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात केला आहे. अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार…. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलं.

अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर अजित पवार नेमका कोणता उमेदवार कोल्हेंच्या विरोधात देणार याची चर्चा होत होती. आता मात्र सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी अजित पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे.

अमोल कोल्हे अन् आढळराव पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तगडी लढत झाली होती. उद्धव ठाकरे यांचे निकडवर्तीय आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसंच जाणते राजकारणी अशी ओळख असलेल्या आढळराव पाटील यांना राजकारणात नवख्या असणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हरवलं होतं. आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी विजय खेचून आणला. आता जर आढळराव पाटील जर अजित पवार गटासोबत गेले. तर पुन्हा या दोघांमध्ये तगडी लढत होण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.