Mumbai rains: मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचेच; ऑरेंज अॅलर्ट जारी
गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. (Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains)
मुंबई: गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पावसामुळे कुठेही पाणी साचल्याच्या किंवा वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या नसल्याचं वृत्त आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains)
मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे, आतापर्यंत या भागात कुठेही पाणी साचलेले दिसत नाही. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता कमी झाली आहे. येत्या तीन ते चार तासात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात तुफान पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे.
ठाण्यात जोरदार पाऊस
दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा ठाण्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या भागात कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. सद्या तरी सखोल भागात पाणी साचले नसले तरी पावसाचा जोर जर वाढला तर सखल भागात पाणी साचू शकते. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अंबरनाथ, बदलापूरला झोडपले
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि ग्रामीण परिसरातही रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे. सकाळपासून या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मात्र अजून कुठेही पाणी साचल्याची किंवा अन्य घटना नाही घडलेली नाही. कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पालघरमध्ये धुमशान
पालघर जिल्ह्यात पहाटे पासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बोर्डी, डहाणू, चिंचणी, मुरबे, सातपाटी, सफाळे, पालघर या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर पूर्व पाट्यातील बोईसर, मनोर, कासा, चारोटी भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी भरल्याने बोर्डी उंबरगाव रस्ता बंद झाला आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गुजरात राज्यातील उंबरगावातही सखोल भागात पाणी साचले आहे. भातशेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया बळीराजाकडून व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्यातील पाऊस
1) वसई:-86.5 मिमी 2) जव्हार:- 12.00 मिमी 3) विक्रमगड:-10.00 मिमी 4) मोखाडा:- 15.40 मिमी 5) वाडा :- 67.00 मिमी 6) डहाणू :- 88.92 मिमी 7) पालघर:-110.50 मिमी 8) तलासरी :- 38.6 मिमी एकुण सरासरी 53.615 मिमी (Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 August 2021 https://t.co/KwVyAQYqAo #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
संबंधित बातम्या:
Mumbai and Maharashtra rains Live : मुंबईसह राज्यभरात तुफान पाऊस, जळगाव, औरंगाबादेत ढगफुटी
Maharashtra Rains : कन्नड-चाळीसगाव सीमेवर ढगफुटी, दरड कोसळल्याने वाहने अडकली, जळगावात पूर
Aurangabad Rain : तुफान पावसाने तलाव फुटला, मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून बाहेर काढलं
(Mumbai, Thane, and Palghar continue to receive heavy rains)